एक्स्प्लोर

हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्ववत, गर्दी मात्र कायम

मुंबई : तब्बल पाच तासांच्या खोळंब्यानंतर हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली आहे. पनवेलहून कुर्ल्याला जाणाऱ्या गाडीचा प्रवास सीएसटीपर्यंत वाढवण्यात आला. त्यामुळे आता अप मार्गावरही वाहतूक सुरु झाली आहे. जीटीबी नगरजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी मुंबईत हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. जीटीबी नगर डाऊन मार्गावर मालगाडीचे शेवटचे चार डबे घसरल्याने सीएसटी ते कुर्ला वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळी 4.35 ला ही घटना घडली. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते पनवेल मेन लाईनवरुन वाहतुक सुरू ठेवण्यात आली. तर सीएसटी ते अंधेरी वाहतूकही सुरु आहे. प्रवाशांना मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय प्रवाशांसाठी वडाळा, कुर्ला डेपोतून बेस्टच्या अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या. वाहतूक सुरु करण्यात आली असली तरीही लोकलचं वेळापत्रक मात्र कोलमडल्याचं चित्र आहे. कारण कुर्ला, वाशी, वडाळा या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मध्य रेल्वेने वाशीहून ठाण्यासाठी अतिरिक्त लोकल सोडल्या आहेत. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी ट्रान्सहार्बर मार्गावरुन ठाण्याहून प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे. पनवेल ते कुर्ला या मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर सकाळी साडे नऊ वाजता सीएसटीच्या दिशेने पहिली लोकल धावली. पुन्हा घातपाताचा कट? मालगाडीचा हा अपघात घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण रेल्वे रुळ कापल्याने ही दुर्घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. रेल्वे रुळ कापलेला असल्यामुळेच मालगाडीचे शेवटचे चार डबे घसरले. यापूर्वीही अनेकदा मुंबई आणि परिसरात रेल्वे रुळावर लोखंडी रॉड आणून ठेवल्याचं आढळून आलं होतं. हार्बर मार्गावरची वाहतूक पूर्ववत, गर्दी मात्र कायम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP MajhaTop 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Embed widget