एक्स्प्लोर
Advertisement
दोरीत पंख अडकलेल्या घारीला अग्निशमन दलाकडून जीवदान
मुंबई: मुंबईतल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एका घारीला जीवदान दिलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात एका झाडावर उलट्या लटकलेल्या या घारीचे सुटकेचे प्रयत्न सुरु होते. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाला याबाबत कळवलं.
घटनास्थळी पोहचताच अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या साहाय्यानं एका दोरीत पंख अडकलेल्या घारीला अलगद मुक्त केलं आणि घारीसह सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. बिथरलेल्या आणि जखमी झालेल्या या घारीला बास्केटमध्ये घालून पुढील उपचारांसाठी नेण्यात आलं.
मात्र, या घटनेने पुन्हा एकदा माणसांप्रमाणेच पशु-पक्षांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असलेल्या अग्निशमन दलाच्या कौशल्याचे दर्शन घडले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
मुंबई
Advertisement