एक्स्प्लोर
भिवंडीत भंगाराच्या गोदामाला आग
विशेष म्हणजे भिवंडी शहरात अनेक भंगारची गोदामे अनधिकृत उभी राहिली असून ही गोदामे रहिवाशी परिसरात असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
भिवंडी : भिवंडी शहरातील टावरे कंपाऊंड, अशोक नगर परिसरामध्ये भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. गोदाम पूर्णपणे जळून खाक झालं असून या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 4 तासांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवला आहे. या गोदामात प्लास्टिक व कागदाच्या वस्तू होत्या.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या जागेवर पोहचल्या होत्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले.
घटनास्थळी रहिवाशी परिसर असल्याने नागरीकांनी घरं रिकामी करुन घरातील साहित्य बाहेर काढले. धुरामुळे नागरिकांना डोळ्याचा तसेच श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे भिवंडी शहरात अनेक भंगारची गोदामे अनधिकृत उभी राहिली असून ही गोदामे रहिवाशी परिसरात असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच ही गोदामे अतिशय दाटीवाटीच्या परिसरात असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहचण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागला अशा गोदमावर पालिकेच्या वतीने कार्यवाही का केली जात नाही, अशा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
भारत
राजकारण
Advertisement