एक्स्प्लोर
ठाण्यात 9 थर रचणाऱ्या 'जय जवान' मंडळावर गुन्हा दाखल
![ठाण्यात 9 थर रचणाऱ्या 'जय जवान' मंडळावर गुन्हा दाखल Fir File On Jai Jawan Mandal ठाण्यात 9 थर रचणाऱ्या 'जय जवान' मंडळावर गुन्हा दाखल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25160816/jai1-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: सुप्रीम कोर्टाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या जय जवान पथक आणि ठाण्यातील नौपाडामधील मनसेचे हंडी आयोजक अविनाश जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजक भोसलेंना यासंदर्भातली नोटीस धाडली आहे.
नौपाड्यात जय जवान पथकानं 9 थर रचून कोर्टाच्या नियमांचा अवमान केला आहे. त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे.
नौपाड्यात जय जवान मंडळाने 9 थरांची सलामी दिली. यावेळी पोलिसांनी कुणालाही रोखलं नाही. मात्र, कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलीस ठाण्याने यासंदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान, नौपाड्यात मनसेकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. 40 फुटांवर बांधण्यात आलेल्या या हंडीला कायदाभंग असं नाव देण्यात आलं आहे. जे पथक याठिकाणी 9 थर लावेल त्यांना मनसेकडून 11 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. ते जोगेश्वरीच्या जय जवान मंडळाने पटकावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)