(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यात बनावट पनीर बनवणाऱ्यांवर एफडीएची कारवाई, 700 किलो पनीरचा साठा नष्ट
या कारवाईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जवळपास साडे चार लाखांचा माल जप्त केला आहे. सूर्यफूल तेल, ग्लिसरिल मोनो स्ट्रीट लिक्विड ,दूध पावडरच्या साहाय्याने बनावट पनीर बनवले जात होते.
मुंबई : बनावट पनीर तयार करणाऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली आहे. वसईमधील शिवकृपा डेअरी आणि पालघरमधील शुक्ला डेअरीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने हा कारवाई केली आहे.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत जवळपास साडे चार लाखांचा माल जप्त केला आहे. सूर्यफूल तेल, ग्लिसरिल मोनो स्ट्रीट लिक्विड ,दूध पावडरच्या साहाय्याने बनावट पनीर बनवले जात होते.
अन्न सुरक्षा अधिकारीकडून छापा टाकून शुक्ला डेअरीमधून 88 हजार 500 रुपये किमतीचं 354 किलो बनावट पनीर जप्त केलं. तसेच 10 हजारांचं 40 किलो स्कीम्ड मिल्क पावडर , 8 किलो ग्लिसरिल मोनो स्ट्रीट लिक्विड असा एकूण 99 हजार 540 रुपयांचा साठा जप्त केला आहे. पनीरचा एकूण 354 किलोचा साठा नष्ट करण्यात आला असून एकूण 3 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
ठाण्याच्या शिवकृपा डेअरीमधून 359 किलो बनावट पनीर, 409 किलो स्कीम्ड मिल्क पावडर, 10 किलो ग्लिसरिल मोनो स्ट्रीट लिक्विड असा 3 लाख 32 हजार 599 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच बनावट पनीरही नष्ट करण्यात आले.
संबंधित बातम्या
चितळेंच्या नावाने बनावट गुलाबजाम, नागपुरातील कारखान्यावर पोलिसांची कारवाई
मिरारोडमध्ये बनावट बटर बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश
मुंबईकरांचं चीज-बटर उस्मानाबादच्या जनावरांच्या कारखान्यातून?
खादाडखाऊ : अटर्ली बटर्ली पण फक्त डिलीशअस?