एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सावधान! मुंबईतील बाजारात बनावट सनस्क्रीन लोशनचा धुमाकूळ
मुंबई : नितळ त्वचेसाठी अनेकजण सनस्क्रीन लोशनचा वापर करतात. मात्र, सनस्क्रीन लोशन वापरताना काळजी बाळगण्याची नितांत गरज आहे. कारण बाजारात मोठ्या प्रमणात बनवाट सनस्क्रीन लोशन असल्याचे आढळले आहे. अन व औषध विभागाने मुंबईत केलेल्या कारवाईत सुमारे अडीच कोटींचे बनावट सनस्क्रीन लोशनचे पॅकेट्स जप्त केले.
मुंबईतील अन्न व औषध विभागाने दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि भोईवाडा येथे छापा मारला. या छाप्यात सुमारे अडीच कोटींचा बनावट सनस्क्रीनचा साठा जप्त केला. महाराष्ट्र अन्न व औषध विभागाचे आयुक्त डॉ. हर्षवर्धन कांबळे यांनी याबाबत माहिती दिली.
“क्रॉफर्ड मार्केटमध्ये बनावट सनस्क्रीन लोशन असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, छापा मारण्यात आला. तिथे मोठा साठा मिळाला. मग तिथून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता, भोईवाड्यातही असेच बनवाट सनस्क्रीन लोशनचे पॅकेट्स असल्याचे कळले. तिथूनही माल जप्त केला. आतापर्यंत सुमारे अडीच कोटींचा माल जप्त केला.”, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन कांबळे यांनी दिली.
“कॉस्मेटिक स्वस्त मिळतात म्हणून खरेदी करु नका. पॅकेटवरील किंमत, एक्स्पायरी आणि इतर माहिती तपासून पाहा. शिवाय, अशाच ठिकाणाहून लोशन खरेदी करा, जिथून तुम्हाला खरेदी केल्यावर बिल मिळू शकेल.”, असं आवाहनही डॉ. हर्षवर्धन कांबळेंनी केलं आहे.
दरम्यान, मुंबईतून जप्त केलेल्या कॉस्मेटिक्स तपासणी केल्या असून, त्या बनावट असल्याच्या आढळल्या आहेत. आता संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे जाबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. शिवाय, अधिक माहिती मिळत असून, आणखी छापे मारण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. कांबळे यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement