एक्स्प्लोर
नवी मुंबईत 14 वर्षीय मुलाची हत्या करुन पित्याची आत्महत्या

नवी मुंबई : आपल्या 14 वर्षीय गतिमंद मुलाची हत्या करुन पित्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर 5 मध्ये हा प्रकार घडला. महेशकुमार पवार असं पित्याचं नाव असून आयुष्य संपवण्यापूर्वी त्यांनी 14 वर्षांच्या कौशलचाही जीव घेतला. महेशकुमार हे कोकण भवनमधील वजन वैद्य मापन खात्यात निरीक्षक म्हणून कार्यरत होते. महेशकुमार यांनी गॅस सिलेंडरचा मास्क मुलाच्या तोंडाला लावला, मुलाचा जीव गेल्यानंतर त्यांनी स्वतःच्याही तोंडाला मास्क लावून आत्महत्या केली. गुरुवारी रात्रीची घटना असून शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























