एक्स्प्लोर

ओशो रजनिश यांच्या मृत्यूपत्राची भारतातील प्रत बनावट!

ओशो रजनिश यांच्या मृत्यूपत्राची मूळपत्र जगात कुठेही उपलब्ध नाही, अशी माहिती पुणे ईओडब्ल्यूच्यावतीने हायकोर्टात देण्यात आली.

पुणे : आध्यात्मिक गुरु ओशो रजनिश यांच्या मृत्यूपत्राची भारतात उपलब्ध असलेली प्रत ही बनावट असल्याचा दिल्लीतील फॉरेन्सिक लॅबचा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला. तर ओशो रजनिश यांच्या मृत्यूपत्राची मूळपत्र जगात कुठेही उपलब्ध नाही, अशी माहिती पुणे ईओडब्ल्यूच्यावतीने हायकोर्टात देण्यात आली. त्यामुळे निव्वळ झेरॉक्स कॉपीवरून ओशो रजनिश यांची सही खरी की खोटी याची पडताळणी करणं कठीण असल्याचं सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. मात्र याचिकाकर्त्यांच्यावतीने दिल्लीतील फॉरेन्सिक लॅबच्या अहवालावर उत्तर देण्याचे निर्देश हायकोर्टाने पुणे पोलिसांना दिले. पुणे पोलिसांच्या ईओडब्ल्यू शाखेकडून सादर झालेल्या तपासाच्या अहवालावर हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. एखाद्या खाजगी कंपनीत देतात तसा वार्षिक अहवाल सादर करू नका, या शब्दांत हायकोर्टाने तपास अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. पराराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने तपासयंत्रणा स्पेनच्या कोर्टातून ओशो रजनिश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत भारतीय कोर्टात सादर करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र तिथेही याची मूळप्रत उपलब्ध नसल्याचं त्यांनी हायकोर्टाला कळवलं. त्यामुळे हायकोर्टाने एक ऑगस्टपर्यंत या खटल्याची सुनावणी तहकूब केली. पुढील सुनावणीस तपासाचा प्रगती अहवाल योग्य पद्धतीने सादर करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले. न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी याचिकाकर्ते योगेश ठक्कर यांनी या प्रकरणाचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी हायकोर्टात केली. ओशो रजनिश यांचं खोटं मृत्यूपत्र बनवून ट्रस्टने कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप ओशोंचे निकटवर्तीय आणि याचिकाकर्ता योगेश ठक्कर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला. या प्रकरणी ठक्कर यांनी केलेल्या तक्रारीवर चार वर्ष उलटून गेली तरी पुणे पोलिसांना या केसमध्ये कोणतंही यश मिळालेलं नाही. त्यामुळे हायकोर्टाच्या निर्देशांनंतर हा तपास सध्या ईओडब्ल्यू शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget