एक्स्प्लोर
चालत्या ट्रेनमधून उतरताना रेल्वेखाली पडून तरुणीचा मृत्यू
गाडीतून उतरताना मीनलचा तोल गेल्याने ती प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या गॅपमध्ये सापडली आणि थेट चाकाखाली आली.
कल्याण : चालत्या ट्रेनमधून उतरताना रेल्वेखाली पडल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली. मीनल पाटील असं या तरुणीचं नाव असून ती नागपूरला राहणारी होती.
मीनलची रविवारी मुंबईत परीक्षा होती. त्यासाठी शुक्रवारी रात्री नागपूरहून दुरांतो एक्स्प्रेसने ती मुंबईला येण्यासाठी निघाली. शनिवारी कल्याणला राहणाऱ्या नातेवाईकांकडे मुक्काम करून रविवारी ती परीक्षेला जाणार होती. मात्र कल्याण स्टेशन जवळ येताच दुरांतो एक्स्प्रेस कल्याणला थांबत नसल्याचं तिला समजलं. त्यामुळे कल्याणला चालत्या गाडीतून उतरण्याचा तिने प्रयत्न केला आणि हा प्रयत्न तिच्या जीवावर बेतला.
गाडीतून उतरताना मीनलचा तोल गेल्याने ती प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या गॅपमध्ये सापडली आणि थेट चाकाखाली आली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
या घटनेमुळे मीनलच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. चालत्या गाडीत चढणं किंवा उतरणं किती धोकादायक ठरु शकतं, हे वारंवार समोर येऊनही अशाप्रकारे नसतं धाडस केल्यानं मीनलचा हकनाक बळी गेला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement