एक्स्प्लोर
ठाण्यात एन्डोस्कोपी ऑन व्हील्स उपक्रम, शेकडो रूग्णांना लाभ
संपूर्ण राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब, गरजूंना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी हे फिरते वैद्यकीय केंद्र महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे.

ठाणे : सध्या धकाधकीच्या आयुष्यात पोटाचे विकार वाढत चालले आहेत. दुर्गम,आदिवासी भागातील लोकांना शहरातील महागड्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात. गरिबांना महागडे उपचार परवडण्यासारखे नसतात. त्यामुळे लोकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सची सुरूवात करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब, गरजूंना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी हे फिरते वैद्यकीय केंद्र महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे. ठाण्याच्या सिविल रुग्णलयात आज हा उपक्रम पार पडला या वेळी ठाणे जिल्हातील शेकडो रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. समाजाचे आपण देणे लागतो, त्यासाठी काहीतरी केले पाहिजे. या विचाराने सुरू झालेली ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. या फिरत्या केंद्रात अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आहे. या गाडीत दोन तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशिअन असतील. एच-पायलोरी, कॅन्सरचे लवकर निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचे निदान, ॲसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी नरेंद्र कुमार बलदोटा परिवाराने देणगी देऊन पुढाकार घेतला आहे. Endoscopy On Wheels | भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र राज्यात सुरु, गरीब रुग्णांना होणार लाभ | ABP Majha केंद्रातील संपूर्ण सुविधा विनामूल्य असेल. त्यामुळे पोटाचे विकार, त्याची कारणे व त्यावरील उपाय आणि उपचार याबाबत लोकांमध्ये या केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. पोटात जे काही विकार असतील किंवा आतड्यांना काही विकार जडले असतील, यावर त्वरित निदान करून प्राथमिक उपचार घेण्यात येणार आहेत. तसेच अधिक दुखणे असतील तर त्यावर शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना याचा लाभ घेण्यात येणार आहे असल्याचे जिल्हा शैल्य चिकित्सक कैलास पवार यांनी सांगितले. फिरत्या पोटविकार केंद्राचा लाभ दिवसभर हजारो रुग्णांनी घेतला. संबंधित बातम्या : भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र राज्यात सुरु, गरीब रुग्णांना होणार लाभ
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























