एक्स्प्लोर
Advertisement
भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र राज्यात सुरु, गरीब रुग्णांना होणार लाभ
एच-पायलोरी, कॅन्सरचं लवकर निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचं निदान, ॲसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल. रूग्णांचे निदान तत्काळ व्हावे आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा त्यांना मोफत मिळाव्यात या दृष्टीने एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सची सुरूवात करण्यात आली असून वर्षभर ही व्हॅन राज्यभर फिरणार आहे.
मुंबई : सध्या धकाधकीच्या आयुष्यात पोटाचे विकार वाढत चालले आहेत. दुर्गम, आदिवासी भागातील लोकांना शहरातील महागड्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात. गरिबांना महागडे उपचार परवडण्यासारखे नसतात. त्यामुळे लोकांना उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सची सुरूवात करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
पद्मश्री डॉ. अमीत मायदेव यांच्या संकल्पनेतली भारतातील पहिली फिरती वैद्यकीय व्हॅन गरीब आणि गरजू रूग्णांना पोट विकारावर अद्ययावत दर्जाचे उपचार देईल, असे या प्रकल्पाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पद्मश्री डॉ.अमित मायदेव यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स’ केंद्र हे भारतातील पहिले केंद्र असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. संपूर्ण राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब, गरजूंना अद्ययावत दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी हे फिरते वैद्यकीय केंद्र महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आले आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
समाजाचे आपण देणे लागतो, त्यासाठी काहीतरी केले पाहिजे. या विचाराने सुरू झालेली ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. या फिरत्या केंद्रात अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आहे. या गाडीत उपस्थित असणारे 2 तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशिअन रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील. एच-पायलोरी, कॅन्सरचं लवकर निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचं निदान, ॲसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल. रूग्णांचे निदान तत्काळ व्हावे आणि उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा त्यांना मोफत मिळाव्यात या दृष्टीने एन्डोस्कोपी ऑन व्हिल्सची सुरूवात करण्यात आली असून वर्षभर ही व्हॅन राज्यभर फिरणार असल्याचे डॉ.मायदेव यांनी सांगितले.
या केंद्रातील संपूर्ण सुविधा विनामूल्य असणार आहे. त्यामुळे पोटविकार होण्याची कारणे व त्यावरील उपाय आणि उपचार याबाबत लोकांमध्ये या केंद्राच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. एखाद्या प्रकरणात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास डॉ.मायदेव स्वत: गाडीवर उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांना मार्गदर्शन करतील. या गाडीचे प्रभारी म्हणून ग्लोबल रुग्णालयाचे संचालक डॉ.अमित मायदेव सर्व कामकाज पाहणार आहेत.
काय आहेत या गाडीची वैशिष्ट्य?
- 'एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स' ही गाडी वर्षभर महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागात फिरणार आहे.
- या गाडीत अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज ऑपरेशन थिएटर आहे.
- या गाडीत उपस्थित असणारे 2 तज्ज्ञ डॉक्टर आणि टेक्निशिअन रुग्णांना वैद्यकीय सुविधा देतील.
- एच-पायलोरी, कॅन्सरचं लवकर निदान, आतड्यांचे अल्सर, बायोप्सी, आतड्यांना सूज आली असेल तर त्याचं निदान, ऍसिडिटीची तपासणी या केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement