एक्स्प्लोर
जगातील सर्वात लठ्ठ महिलेवर मुंबईनंतर अबुधाबीत उपचार!
मुंबई: वजन कमी करण्यासाठी मुंबईत आलेली जगातील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद मुंबई सोडणार आहे. कारण, आता पुढील उपचार तिच्यावर अबुधाबीत होणार आहे.
मुंबईतल्या सैफी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान इमानचं 50 टक्के वजन घटलं आहे. मात्र, इमानची प्रकृती खालावल्याचा दावा इमानची बहीण सायमानं केला. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासन आणि सायमामध्ये वाद झाले. अखेर आज तिला अबुधाबीला नेण्यात येणार आहे.
अबुधाबीतल्या बुर्जील हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात येतील.
संध्याकाळी साडे चार वाजता मुंबईतल्या विमानतळावरुन ती अबुधाबीला रवाना होईल. थोड्या वेळातच सैफी रुग्णालयातून मुंबई विमानतळावर इमानला नेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सैफी रुग्णालय ते विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडोर करण्यात आलं आहे.
संंबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement