Elephanta Caves : घारापुरी लेण्यातील शिवमंदिरात पूजा करण्यास परवानगी द्यावी, हिंदु संघटनांची मागणी
Shiva Temple in Gharapuri Caves : घारापुरी लेणीतील हे प्राचीन शिवमंदीर येथे शिवलिंगांची पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.
Elephanta Caves Story : अयोद्धेतील (Ayodhya) राम मंदिरानंतर (Ram Mandir) आता हिंदु संघटनांनी देशातील इतर हिंदु धार्मिक स्थळांकडे मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रात हिंदु धर्मियांची प्राचीन देवस्थळं आहेत. अनेक ठिकाणी हिंदु धर्मियांच्या आस्थेची ठिकाणं ही पुरातत्व खात्याच्या अखत्यारित आहेत. मुंबईजवळील उरण येथील घारापुरी लेण्यांमधील शिवमंदीर ही त्यापैकीच एक आहे. एलिफंटा केव्ह (Elephanta Caves) या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या लेण्यांमधील शिवलिंगाची तसेच शिवमुर्तींची पुजा-अर्चा करता यावी आणि हे ऐतिहासिक स्थळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावं, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदु संघटनांनी केली आहे.
'लेण्यातील शिवमंदिरात पूजा करण्यास परवानगी द्यावी'
पुरातन शिवलिंगाची पुजा आणि आरती हिंदु संघटनांनी केली. पुरातत्व खात्याच्या नियमानुसार याला परवानगी नाही. युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या या घारापुरी लेणीतील हे प्राचीन शिवमंदीर येथे शिवलिंग असलेली गर्भगृहे पाहायला मिळतात. या ठिकाणी हिंदु जनजागृती समिती, सुदर्शन वाहिनी आणि स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या पुढाकारानं शिवलिंगाची पुजा आणि आरती करण्यात आली.
हिंदु संघटनांची मागणी
पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेल्या या अतिशय पुरातन लेण्यांमध्ये भगवान शंकराची विविध रुपे पाहायला मिळतात. येथे पूजा-अर्चा किंवा कोणतेही धार्मिक विधी करण्यास सध्या परवानगी नाही. मात्र, स्थानिक गावकरी येथे महाशिवरात्रीला आस्थेप्रमाणे पूजा करतात. इथे नियमित पूजा करण्याचा अधिकार हिंदुंना मिळावा ही मागणी आता हिंदु संघटना करत आहेत.