(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Live : एकनाथ शिंदे कोणता 'बॉम्ब' फोडणार? सात वाजता पत्रकार परिषद घेणार
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Live : उद्धव ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
LIVE
Background
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Live : राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापत असल्याचं चित्र असून वेगवान घडामोडी घडत आहेत. सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली. त्यामुळे सेनेत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि याच परिस्थितीत सेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडाचं हत्यार उपसलं. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना केवळ 35 आमदारांचाच नाही, तर 40 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत ते काल म्हणाले, भाजपसोबत जावं हीच पक्ष हिताची भूमिका आहे. मला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे. मला मंत्रिपद नाही दिलं तरी चालेल. पण भाजपसोबत सरकार बनवा. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणार नाही असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही : एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या माझ्यासोबतच्या आमदारांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे त्यांनी हिंदुत्वाची जी शिकवण दिली त्यावर आम्ही पुढे जात आहोत. सत्तेसाठी असो किंवा मग राजकारणासाठी असो हिंदुत्वाचे बाळासाहेबांचा आहे ते कडवट हिंदुत्व ही भूमिका ही भूमिका आम्ही सर्व जण पुढे घेऊन जातोय. आम्ही सगळे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेना सोडली नाही आम्ही शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढच्या राजकारण समाजकारण करणार आहोत. बाळासाहेबांनी या देशाला हिंदुत्वाचा विचार दिला आहे त्यामध्ये कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही आणि हाच विचार पुढे घेऊन जातोय.
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे फोनवरुन चर्चा
मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक यांची एकनाथ शिंदे यांची भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये राहू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुमचं काही नाही,माझं काही नाही तर जायचं कशाला? उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पुन्हा एकदा शिवसेना आमदारांची आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदार - खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदेशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव दिला असला तरी त्यावर तुर्तस कोणतीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह स्थापन केलेली महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचे सूतोवाच उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केले आहे.
शिवसैनिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया, महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात?
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसैनिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मुंबईत शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक एकत्र आले होते. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडखोरीविरोधात महिला शिवसैनिकांचा आक्रोशही पाहायला मिळाला. त्यावेळी एका महिला शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे आता महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. शिवसेनेच्या एका गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याचं पटलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या धरतीवर शिवसेनेला काँग्रेसची सोबत परवडणार नसल्याचं अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.
भाजपा बहुमताचा 145 चा आकडा गाठू शकते.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतांची जुळवाजुळव केली ती पाहता एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानुसार जर 40 शिवसेना आमदार असतील तर सत्तेची गणित बसवणं भाजपासाठी कठीण जाणार नाही असं चित्र दिसत आहे. भाजपाचे 106 आमदार, एकनाथ शिंदेंना समर्थन करणारे 40 आणि अपक्ष अशी मोट बांधून भाजपा बहुमताचा 145 चा आकडा गाठू शकते.
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला अभिवादन
CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला अभिवादन
मातोश्रीवर रात्री 8 वाजता होणार शक्तीप्रदर्शन, सर्व पदाधिका-यांना मातोश्रीवर जमण्याचे आदेश
मातोश्रीवर 8 वाजता होणार शक्तीप्रदर्शन होणार आहे. मुंबईतल्या सर्व विभागताल्या पदाधिका-यांना मातोश्रीवर जमण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Eknath Shinde : एकनाथ शिंदे कोणता 'बॉम्ब' फोडणार? सात वाजता पत्रकार परिषद घेणार
Eknath Shinde : महाविकासआघाडी सरकारविरोधात बंडांचं निशाण फडकवणारे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे सात वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका मांडतात? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
CM Uddhav Thackeray LIVE : एकाही आमदाराने देखील माझ्या विरोधात मतदान केले तरी ती माझ्यासाठी लाजीरवाणी गोष्ट : उद्धव ठाकरे
मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा... मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे.