एक्स्प्लोर
डोंबिवलीत तरुणाने दारुच्या नशेत कॅश व्हॅन फोडली!
डोंबिवली पश्चिमेच्या उमेशनगर परिसरात बुधवारी रात्री हा प्रकार घडला. कॅश व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
डोंबिवली : सततच्या वाहतूक कोंडीला वैतागलेल्या एका तरुणाने दारुच्या नशेत चक्क एटीएम कॅश व्हॅन फोडल्याची घटना डोंबिवलीत घडली. डोंबिवली पश्चिमेच्या उमेशनगर परिसरात बुधवारी रात्री हा प्रकार घडला.
एका चिंचोळ्या गल्लीतून एक तरुण कारमधून जात होता. आधीच ट्रॅफिक आणि त्यात समोरुन एटीएम कॅश व्हॅन आल्याने वाहतूक खोळंबली. हा तरुण चांगलाच संतापला. त्याने आधी कॅश व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली आणि नंतर कॅश व्हॅनवर थेट दगडं मारायला सुरुवात केली.
यात कॅश व्हॅनच्या काचा फुटल्या, मात्र सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. हा सगळा प्रकार सुरू असताना रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली, मात्र कुणाचीही मध्ये पडण्याची हिंमत झाली नाही.
अखेर कॅश व्हॅनच्या कर्मचाऱ्यांनीच या तरुणाला पकडून पोलीस ठाण्यात नेलं. तिथे चूक कबूल करून नुकसानभरपाई दिल्यानंतर या तरुणाला समज देऊन सोडण्यात आलं.
दरम्यान, या सगळ्या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून सोशल मीडियावर ते व्हायरल झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement