एक्स्प्लोर

पाण्यातून चालताना डॉ. अमरापूरकर मॅनहोलमध्ये कोसळले?

डॉ. दीपक अमरापूरकर दुपारी 4.30 च्या सुमारास प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले. एलफिस्टन पश्चिम भागात त्यांनी आपली गाडी सोडली. पण, त्यानंतर अजूनपर्यंत त्यांचा काहीच ठावठिकाणा नाही.

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. अनेक लोक वाहनं रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले. बॉम्बो हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरही दुपारी 4.30 च्या सुमारास प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले. एलफिस्टन पश्चिम भागात त्यांनी आपली गाडी सोडली. पण, त्यानंतर अजूनपर्यंत डॉ. अमरापूरकरांचा काहीच ठावठिकाणा नाही. बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉ. भन्साळी कालपासून चिंतेत आहेत. कारण त्यांचे सहकारी डॉ. दीपक अमरापूरकर कालपासून बेपत्ता आहेत. अमरापूरकर काल सकाळी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी दैनंदिन सगळी कामं केली. पण दुपार होताहोता पावसाचा जोर वाढला. पाणी साचल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे डॉ. अमरापूरकरांनीही घराकडे धाव घेतली. लोअर परेलपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन घर गाठण्याचा अमरापूरकरांचा विचार होता. त्यांनी गाडी सोडून दिली. गुडघाभर पाण्यातून वाट काढत अमरापूरकर चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नाहीत. लोअर परेलमधील काही निकटवर्तींयांच्या माहितीनुसार अमरापूरकर जवळच्या मॅनहोलमध्ये कोसळले. पाण्याचा निचरा व्हावा म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांनी मॅनहोलचं झाकण काढलं होतं. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज न आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले. डॉ. दीपक अमरापूरकर यांची ओळख डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे आहेत. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख आहे. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठातील गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट शाखेतले ते पहिले तज्ज्ञ ठरले. बॉम्बे हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोअँड्रॉलॉजी विभागाचे ते प्रमुख आहेत. त्यांची पत्नी डॉ. अंजली या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. तर दोन्ही मुलं उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत आहेत. गेल्या 24 तासांपासून अमरापूरकरांच्या शोधासाठी कुटुंबीय, निकटवर्तीय आणि पोलीस प्रयत्न करत आहेत. मुंबईत कालच्या पावसाने आपल्याकडून काय काय हिरावून घेतलंय याची अजून गणतीही सुरु झालेली नाही. त्याआधी अमरापूरकरांचं बेपत्ता होणं चटका लावणारं आहे. संबंधित बातम्या :

मुंबईचा पाऊस : सायनमध्ये गाडीत गुदमरुन वकिलाचा मृत्यू

पाणी उकळून प्या, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन

LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स

मुंबईचा पाऊस : कालच्या पावसात अनेकजण बेपत्ता

मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू

26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य?

मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू

मुंबईत पुन्हा पाऊस सुरु, गरज असेल तरच बाहेर पडा!

मुंबईत कुठे कुठे जेवण-खाणे आणि राहण्याची सोय?

PHOTO : भरपावसात, तुंबलेल्या पाण्यातही मुंबई स्पिरीट

VIDEO : मुलुंड स्टेशनला धबधब्याचं स्वरुप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोलUjjwal Nikam On Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुनावणी, कोर्टात काय घडलं? वरिष्ठ वकील निकमांनी सांगितली A TO Z माहितीABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सAnil Parab vs Fadnavis : शिंदेंसारखे मुंबई रस्त्यावर उरुन डीप क्लिनिंग करणार का? परबांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Kumar Mishra : ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
ज्या ईडी प्रमुखांना सुप्रीम कोर्टाच्या दणक्यामुळे बाजूला करावं लागलं, त्यांनाच आता पीएम मोदींच्या टीममध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी!
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
आयुर्वेदिक डॉक्टरचा देशी जुगाड, उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी कारला केलं शेणाचं लेपन, 50 टक्के तापमान कमी 
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री?, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, भावना गवळींचा परिषदेत हल्लाबोल, तिकडे विधानसभेत राम कदम-वरुण सरदेसाई भिडले
Ajit Pawar : अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
अण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, दादांनी कौतुक करता करता गुपितच फोडलं, म्हणाले, माझं ऐकेल त्याचा फायदाच होतो!
Embed widget