एक्स्प्लोर
Advertisement
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी सज्ज; अशी आहे व्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबरला 63वा महापरिनिर्वाण आहे, त्यानिमित्त चैत्यभूमी सज्ज झाली आहे. महापालिकेडून सर्व सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत.
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबरला 63वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून 25 लाखांहून अधिक अनुयायी दादर चैत्यभूमी येथे येतात. या अनुयायांना शहरातील विविध ठिकाणी नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.
देशभरातून आलेल्या लाखो भीम अनुयायांना दादर शिवाजी पार्क, चैत्यभूमी, राजगृह, हिंदू कॉलनी, दादर रेल्वे स्थानक, कुर्ला एलटीटी स्थानक, डॉ. आंबेडकर महाविद्यालय(वडाळा)आदी ठिकाणी विविध नागरी सुविधा देण्यास मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. चैत्यभूमीवर येणार्या अनुयायांमध्ये लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश असतो. त्यांना शिस्तीने अभिवादन करता यावे व त्यांच्या निवासाची, खाण्या-पिण्याची आणि विश्रांतीची सेवा-सुविधाही महापालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आली आहे.
भारत स्काऊट गाईड हॉल येथे भिक्कूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरात एक लाख चौरस फुटांच्या मंडपाची व्यवस्था, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या अनुयायांसाठी उन्हापासूनच्या संरक्षणासाठी छत, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अभिवादनाच्या रांगेमधील अनुयायांना बसण्यासाठी 150 बाकड्यांची सोय करण्यात आली आहे. चैत्यभूमी येथील आदरांजलीचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अशी आहे व्यवस्था -
- चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था.
- चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या तीन ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा.
- 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
- शिवाजी पार्क मैदान व परिसरात 18 फिरती शौचालये(180 शौचकुपे).
- रांगेत असणाऱया अनुयायांसाठी ४ फिरती शौचालये (४० शौचकुपे).
- 380 पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था.
- रांगेत व परिसरात असणाऱ्या अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याचे 16 टँकर्स.
- संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था.
- अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा.
- चैत्यभूमीलगतच्या चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्यवस्था.
- चैत्यभूमी येथील आदरांजलीचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
- शिवाजी पार्क परिसरात 469 स्टॉल्स् ची रचना.
- दादर(पश्चिम)रेल्वे स्थानकाजवळ आणि एफ/उत्तर, चैत्यभूमी व शिवाजी पार्क, दादर(पूर्व)स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष/ माहिती कक्ष.
- राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
- स्काऊट गाईड हॉल येथे भिक्कू निवास.
- शिवाजी पार्क मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटांवर आच्छादन.
- अनुयायांना मार्गदर्शनाकरीता 100 फूट उंचीचे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसर येथे निदर्शक फुगे.
- भ्रमणध्वनी चार्जिंगकरिता शिवाजी पार्क मैदानातील मंडपात 300 पॉइंट.
- फायबरचे 200 तात्पुरते स्नानगृह व 60 तात्पुरती शौचालये.
- इंदू मिलमागे फायबरची तात्पुरती 60 शौचालये व 60 स्नानगृह.
- रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत असलेले 150 बाकडे.
- शिवाजी पार्कव्यतिरिक्त वडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व लोकमान्य टिळक टर्मिनस(कुर्ला टर्मिनस)येथे तात्पुरत्या निवाऱ्यासह फिरती शौचालये.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement