एक्स्प्लोर
Advertisement
दारुसाठी पैसे न दिल्यानं दगडानं ठेचून दोघांची हत्या, पाच गर्दुल्ले अटकेत
कल्याण: कल्याण जवळच्या म्हारळ गावात दुहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. म्हारळ गावातल्या राधा नगरी परिसरात दोन नेपाळी तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत. राजू सुनार आणि मदन सुनार नावाच्या तरुणांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. तर राजू सुनार याचं गुप्तांग कापण्यात आलं आहे.
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यानं पाच गर्दुल्ल्यांनी दोघांची निर्घृण हत्या केली आहे. मृतकाचं गुप्तांग एका आरोपीकडे मिळाल्यानंतर या दुहेरी हत्याकांडाचा छडा लागला. त्यामुळे अवघ्या दोन तासाच्या आत पाच आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रं फिरवली. पळून जाण्याच्या तयारीत असतानाच टिटवाळा स्टेशनजवळून एका आरोपीला पोलिसांनी पकडलं. दारुसाठी पैसे न दिल्यानं हत्या केल्याचं आरोपींना सांगत आपला गुन्हा कबूल केला. चौकशीत त्यानं पोलिसांना आपल्या चारही साथीदारांचं नाव सांगितलं. त्यानंतर चारही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement