एक्स्प्लोर

अनिल गोटे यांचा बोलविता धनी नेमका कोण?: धनंजय मुंडे

मुंबई: भाजप आमदार अनिल गोटे यांच्या विधानपरिषद बरखास्तीसंबंधी वक्तव्याचा आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला. अनिल गोटेंकडून ही मागणी वारंवार केली जात आहे. त्यामुळे अनिल गोंटेच्या मागचा बोलविता धनी नेमका कोण आहे? असा सवालही त्यांनी विचारला. ‘कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर ही अनिल गोटे यांचं विधानपरिषदेचं अवमान करणारं वक्तव्य सुरुच आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी खालच्या सभागृहाचा सभात्याग केला. वरच्या सभागृहाचा अडथळा ठरू नये म्हणून वारंवार अशी मागणी करायला लावली जाते आहे का? अशी शंका उपस्थित होते. नेमकं गोटे यांच्या या वक्तव्यामागचा बोलवता धनी कोण आहे? हे समोर येणं गरजेचं आहे.’ असं म्हणत धनंजय मुंडेंनी अनिल गोटेंचा समाचार घेतला. दरम्यान, विधानपरिषदेत शिवसेनेनं देखील या प्रकरणी आवाज उठवला. शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी याबाबत विधानपरिषदेत गोटे यांच्यावर हक्कभंग आणू शकतो का? अशी विचारणा केली. ‘सभापतींनी दिलेल्या निर्देशांचा अवमान केल्यामुळे अनिल गोटे यांच्याविरोधात हक्कभंग स्वतः सभापती आणू शकतात का? किंवा आम्ही हक्कभंग आणू शकतो का? यावर मार्गदर्शन करावं.’ असं परब म्हणाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी देखील अनिल गोटेंवर हल्लाबोल केला. ‘सभागृहात सदस्यांचं वर्तन अयोग्य असल्याने त्यांचं निलंबन होतं. मग तिसऱ्यांदा विधानपारिषदेबाबत अवमानकारक विधान केलं जात आहे यावर कारवाईसाठी घटनेत तरतूद आहे की नाही हे स्पष्ट करावं?’ असा सवाल राणेंनी उपस्थित केला. या सर्व प्रकारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत उत्तर दिलं. ‘अनिल गोटे यांचं वक्तव्य सभागृहाच्या पटलावरून काढून टाकण्यात आलं आहे. सरकार आणि मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः या मताचा आहे की दोन्ही सभागृहाच्या सार्वभौमत्व अबाधित राहावं आणि अवमान होईल असं कुठलंही वक्तव्य करणं अयोग्य आहे. यापूर्वीसुद्धा गोटे यांना नोटीस बजावण्यात आली होती. आज नेमकं काय घडलं याची पूर्ण माहिती घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.’ असं मुख्यमंत्री म्हणाले. संबंधित बातम्या: पक्षाने कारवाई केल्यास घरी जाऊन शेती करेन: आ. अनिल गोटे ‘त्या’ विधानाबाबत स्पष्टीकरण द्या, आ. अनिल गोटेंना कारणे दाखवा नोटीस अनिल गोटेंचं वक्तव्य सभागृहाच्या उंचीला न शोभणारं: मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare PC FULL : जनतेनं संजय राऊतांना त्यांची जागा दाखवली - सुनील तटकरेAjit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
मंत्रिमंडळातून का डावललं? सुधीर मुनगंटीवार म्हणाले, तुमच्या मोबाईलवर तुमचा नंबर डायल करा, लागतो का?  
Vijay Mallya : विजय माल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना 14000 कोटी दिले, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
विजय  माल्ल्याला दणका, संपत्ती विकून बँकांची थकबाकी भरली, निर्मला सीतारमण यांच्याकडून आकडेवारी जाहीर
Suhas Kande: छगन भुजबळांनी कितीही ढोंग केले तरी त्यांच्यात राष्ट्रवादी पक्ष सोडण्याची हिंमत नाही: सुहास कांदे
ढोंगी, गद्दार, ओरिजनल भुजबळ असाल तर..., सुहास कांदे छगन भुजबळांना काय काय म्हणाले?
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
Embed widget