एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठक अन् वर्धापनदिनाला हजर असले तरी आमच्याकडून नियमांचं पालन : आरोग्य मंत्री

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुंडे हे मंत्रिमंडळ बैठकीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाला हजर होते. त्यामुळे मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांना संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, आम्ही नियमांचे पालन केल्याने काही काळजी करण्याचं कारण नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग आता सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयात पसरताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाला हजर होते. त्यामुळे मंत्रिमंडळातील आणि विशेषतः राष्ट्रवादीतील काही नेत्यांना संसर्गचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी सर्व नियमांचे पालन करण्यात आले होते. तरीही कोणालाही लक्षणे आढळल्यास त्वरीत कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत. काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले. धनंजय मुंडे हे कॅबिनेट आणि वर्धापन दिनाला उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सक्त आदेशाप्रमाणे आम्ही सर्व नियम पाळले होते. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्रास होत असेल तर आपण काळजी घेणे गरजेचं असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

इतरांना धोका नाही धनंजय मुंडे यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करणार आहोत. ते फायटर आहेत ते परत कमबॅक करतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. दरम्यान, धनंजय मुंडेंची दोनदा तपासणी झाली होती. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तीन दिवसांनी पुन्हा रिपोर्ट केला तेव्हा पॉझिटिव्ह आला. त्यांना आता थोडासा श्वसनाचा त्रास होत आहे बाकी ते ठिक आहेत. ते मंत्रीमंडळाच्या बैठकीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापण दिनाच्या दिवशीही हजर होते. मात्र, आम्ही सर्वजण चांगल्या प्रकारे काळजी घेत आहोत. जोपर्यंत कोरोना संसर्गावर लस येत नाही. तोपर्यंत आपल्या सर्वांना काळजी घ्यायची गरज आहे. वर्धापनादिनाच्या दिवशी पाच मिनिटांचा कार्यक्रम झाला. यावेळी सर्व नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, कोणालाही लक्षणे आढळले तर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद राज्यात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस होता. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोना, कॅबिनेटसह राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sahmbhuraj Desai PC : दिल्लीच्या बैठकीत काय काय घडलं? शंभुराज देसाईंनी सांगितली इनसाईड स्टोरीCity 60 | सिटी 60 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एबीपी माझा ABP Majha : 29 NOV 2024ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 29 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स-Shilpa Shetty ED Raid : अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या घरावर ईडीचा छापा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Mahayuti Oath Taking Ceremony: महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
भाजप 20, शिवसेना 12-13 मंत्रिपदं, महायुतीचा फॉर्म्युला, अजितदादांचे किती आमदार मंत्री होणार?
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Embed widget