एक्स्प्लोर

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर मुंडे हे कोरोनाची लागण झालेले तिसरे मंत्री आहेत. मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  याच त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं नाहीत.  काल रात्री त्यांच्या कोरोना टेस्टचे अहवाल आले. याआधी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसंच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यातील अनेकजण कोरोनावर मात करुन घरी परतलेत. आता मंत्री मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मुंडे यांनी  8 जून रोजी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते. मंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. सोबतच ते 10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते. मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याने जे या बैठकीला आणि कार्यक्रमाला हजर होते त्यांच्यात भीतीचे वातावरण असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ बैठकीला आणि  राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजर मंत्री तसेच अधिकारी यांची कोरोना चाचणी केली जाणार का? हा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच आता पुढच्या कॅबिनेटवर देखील प्रश्न चिन्ह आहे. दरम्यान स्वतः धनंजय मुंडे तसेच त्यांच्या ऑफिसने ते गेल्या काही काळात ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले अशा मुंबई आणि परळीत फोन करुन सर्वांना टेस्ट आणि क्वारंटाईन होण्यासाठी सूचित केले आहे. राज्यात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद राज्यात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस होता. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या 54 शासकीय आणि 41 खासगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोविड 19 निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 6,09317 नमुन्यांपैकी 97,648 नमुने पॉझिटिव्ह (16 टक्के) आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget