एक्स्प्लोर
मुंबईत दाऊदच्या भाच्याचा बुधवारी विवाह सोहळा
मुंबईः कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भाच्याचा बुधवारी म्हणजेच 17 ऑगस्टला मुंबईत विवाह सोहळा होणार आहे. दाऊद या विवाह सोहळ्यात स्काईपद्वारे सहभागी होणार असल्याची माहिती पोलिसातील सुत्रांनी दिली आहे. लग्नानंतर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे.
या रिसेप्शनसाठी दाऊदचा भाऊ ईकबाल कासकर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कार्यक्रमावर मुंबई पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यापूर्वीही दाऊदचा भाचा दानिश याचा विवाह झाला होता. या विवाह सोहळ्यामध्ये डी कंपनीतील अनेक लोकांनी हजेरी लावली होती.
असा होईल लग्न सोहळा
आलिशाह पारकर दाऊदची दिवंगत बहिण हसीना पारकरचा मुलगा आहे. हसीना पारकरचा दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. 'एबीपी न्यूज'ला या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिका देखील हाती लागली आहे.
निमंत्रण पत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 11 वाजता नागपाडा येथील तेली गल्लीत आलिशाहचा विवाह आयशा नावाच्या मुलीशी होणार आहे. आयशा शिराज नागाणी नावच्या उद्योगपतीची मुलगी आहे.
लग्नानंतर रात्री 9 वाजता जूहूच्या हॉटेल ट्युलिप स्टारच्या हार्बर हॉलमध्ये रिसेप्शन होणार आहे. लग्नासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधी आणि अनिमंत्रित पाहुणे रोखण्यासाठी बाऊन्सर तैनात करण्यात येणार आल्याची माहिती आहे.
ईकबाल कासकरच्या विवाहाला दाऊद उपस्थित राहणार?
भारतातून फरार झाल्यानंतर दाऊद अद्याप कुटुंबाच्या कसल्याही सुख-दुःखात सहभागी झालेला नाही. दाऊद आई-वडिलांच्या निधनानंतरही भारतात आला नव्हता. हसीना पारकरचा मोठा मुलगा दानिशच्या विवाहात देखील दाऊद सहभागी झाला नव्हता. दाऊदने या विवाहाचे फोटो मागवले होते.
दाऊद भविष्यात त्याचा भाऊ ईकबाल कासकर याच्या विवाहात सहभागी होईल, असा अंदाज लावला जात आहे. इकबाल सध्या एका गुन्ह्यातून मुक्त झाला असून दक्षिण मुंबईत रियल इस्टेटचा व्यवसाय पाहत आहे. दरम्यान पोलिसांची या विवाह सोहळ्यावर करडी नजर असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement