एक्स्प्लोर

Mumbai Crime News: वडिलांवर रागावून मुलीने घर सोडलं...; रिक्षाचालकाने अर्नाळ्यात नेऊन तरूणीवर केले अत्याचार, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime News: गोरेगाव पूर्वेत वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे.

मुंबई: मुंबईतील एक भयावह घटना (Mumbai Crime News) समोर आली आहे. एका रिक्षाचालकाने (21 जानेवारी 2025 रोजी) 20 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना राम मंदीर परिसरात घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केलं आहे. आरोपीने अत्याचार केल्याचंही कबूल केलं आहे. सदर घटनेनं मात्र मुंबई हादरली आहे. तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह  हल्ला करून तिला जखमी अवस्थेत सोडून दिलं. या पिडित तरूणीच्या गुप्तांगात काही दगडाचे तुकडेही घालण्यात आले होते(Mumbai crime News). गोरेगाव पूर्वेत वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. पुढील तपास वनराई पोलीस करत आहे.

या संतापजनक घटनेतील नराधम आरोपी रिक्षाचालकाचं नाव राजरतन सदाशिव वायवळ असून तो 32 वर्षांचा असून त्याला 2 मुली असल्याची माहिती मिळाली आहे. राजरतन सदाशिव वायवळला नालासोपारा वाळीव येथील खैरपड्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमूखे वनराई पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

आत्महत्या करण्याच्या उद्देशाने ती घरातून निघाली पण...

ही पिडित तरूणी घरातून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निघालेली असताना तिला फूस लावून रिक्षाचालकाने तिला रिक्षातून अर्नाळा येथे आणून तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. राजरतन वायवळ (वय 32) असे आरोपीचे नाव आहे. 

22 जानेवारीला रात्री उशिरा एक तरुणी राम मंदिर रेल्वेस्थानकाबाहेर रडत होती. तिला पाहून एका व्यक्तीने तिची चौकशी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आलं. यानंतर पोलिसांनी या तरुणीला सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिथे  तिच्या गुप्तांगातून डॉक्टरांनी सिझेरियनचे ब्लेड आणि दगडाचे तुकडे बाहेर काढले.

नैराश्यातून सोडले घर 

पिडिता वडिलांच्या रागीट स्वभावामुळे आलेल्या नैराश्यातून घरातून निघून गेली होती, अशी धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. नालासोपारा येथे एका रिक्षाचालकाने विचारपूस केल्यानंतर तिने आत्महत्या करायची आहे, असं सांगितलं. त्यानंतर त्याने तिला अर्नाळा येथे आणून तिच्यावर अमानुष अत्याचार केले.

वनराई पोलिसांनी कोणती माहिती दिली?

वनराई पोलीस ठाण्यास दिनांक 22/01/25 रोजी एक महिला वय 20 वर्षे ही एकटी मुलगी गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानक परिसरात मिळून आल्यानंतर तिचेवर उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर महिलेकडे नमूद घटनेच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली असता, तिने दि. 21/01/25 रोजी रात्री वसई स्टेशन परिसरात भेटलेल्या एका अनोळखी रिक्षा चालकाने तिच्यावर वसई जवळील सागरी बीचवर जबरदस्तीने संभोग केल्याचे सांगितल्याने तिचा सविस्तर जबाब नोंद करुन वनराई पोलीस ठाणे गु.र.क्र.27/25, कलम 64 (2) (एम) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्हाच्या तपासाकरीता परिमंडळीय पथके तयार करण्यात आली. बळीत मुलीकडून प्राप्त माहितीच्या आधारे विरार ते चर्चगेट रेल्वे परिसर, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या आधारे आरोपी नामे राजरतन सदाशिव वायवळ, वय 32 यास खैरपाडा, वालीव येथील झोपडपट्टीमधून ताब्यात घेण्यात पोलीस पथकास यश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad and Prajkta Mali: 'सावित्रीबाई फुले...' मालिका बंद पडताना नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, प्राजक्ता माळींनी बोलायला हवं होतं, पण... जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
'सावित्रीबाई फुले...' मालिका बंद पडताना नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, प्राजक्ता माळींनी बोलायला हवं होतं, पण... जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
NCP Sharad Pawar Camp Vardhapan Din 2026: 'आमची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही'; शरद पवारांच्या युवा शिलेदारांची घणाघाती भाषणं, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा गाजवला
'आमची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही'; शरद पवारांच्या युवा शिलेदारांची घणाघाती भाषणं, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा गाजवला
London Marathi family Death : लंडनमध्ये भारतीय कुटुंबाचा दुर्दैवी अंत; 36व्या मजल्यावरून दाम्पत्यासह मुलानं झोकून दिलं, तपासात धक्कादायक माहिती समोर
लंडनमध्ये भारतीय कुटुंबाचा दुर्दैवी अंत; 36व्या मजल्यावरून दाम्पत्यासह मुलानं झोकून दिलं, तपासात धक्कादायक माहिती समोर
Sandeep Deshpande: मुंबईच्या महापौरांमध्ये हिंमत नाही, त्या गुजराती लोकांना विकल्या गेल्यात; मनसेच्या संदीप देशपांडेंची घणाघाती टीका
मुंबईच्या महापौरांमध्ये हिंमत नाही, त्या गुजराती लोकांना विकल्या गेल्यात; मनसेच्या संदीप देशपांडेंची घणाघाती टीका

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget