एक्स्प्लोर
मुंबईत हार्बर रेल्वेवर रुळाला तडे, लोकल 20-25 मिनिटं उशिराने
मुंबई : मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गाची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. मानखुर्द स्टेशनजवळ रेल्वेरुळाला तडे गेल्यानं वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरु आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी हार्बर रेल्वेमार्गावरील मानखुर्द स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेले. दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं असलं तरी अद्याप वाहतूक पूर्ववत होण्यास काही वेळ लागणार आहे.
पनवेलवरुन मुंबई सीएसटीच्या दिशेनं येणारी वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं आहे. सकाळच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक रखडल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement