एक्स्प्लोर

श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका, नगरसेवकपद रद्द

छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपदच सरकारने रद्द केलं आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने दणका दिला आहे. श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. महापुरुषाचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर ही कारवाई केली आहे.

महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी छिंदमवर कारवाई करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर गुरुवारी (27 फेब्रुवारी) सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र छिंदमने या सुनावणीला दांडी मारली. त्यानंतर आजच्या सुनावणीलाही छिंदम अनुपस्थित होता. अखेर आज छिंदमला मुदतवाढ न देता किंवा त्याची वाट न पाहता नगरविकास विभागाने निकाल सुनावला.

शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी

काय आहे प्रकरण? 2018 मध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदमने एका कामाबाबत पीडब्लूडीचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला होता. यावेळी बोलताना छिंदमने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका झाली. शिवरायांविषयी अवमानकारक भाष्य केल्यानंतर श्रीपाद छिंदमला हद्दपार करण्यात आलं होतं. 16 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीपाद छिंदमला पोलिसांनी अटक केली. छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला तुरुंगवासही भोगावा लागला होता. छिंदमला सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला होता. राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात त्याने म्हटलं होतं. शिवरायांचा अवमान करणारा छिंदम शिवरायांसमोरच नतमस्तक महापालिका निवडणुकीत विजय अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून छिंदम निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या श्रीपाद छिंदमने दोन हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला. ज्या भाजपमधून त्याची हकालपट्टी झाली, त्याच पक्षाचा उमेदवार प्रदीप परदेशीचा त्याने पराभव केला. त्यामुळे छिंदमने सर्व मतदारांचे आभारही मानले. माजी उपमहापौर असलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. भाजपमधून बाहेर काढल्यानंतर त्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असल्याने तो तडीपार असतानाही या निवडणुकीत विजयी झाला. विधानसभेत बसपाकडून निवडणूक लढवली अहमदनगर महापालिका निवडणुकीत विजी झाल्यानंतर श्रीपाद छिंदम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला. अहमदनगर शहर मतदारसंघात त्याने बहुजन समाज पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्याच्याविरोधात शिवसेनेचे अनिल राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे उमेदवार होते. मात्र इथे त्याचा पराभव झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget