Coronavirus | राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 38 वर, मुंबईत आणखी तीन रुग्ण आढळले
मुंबईत 3 आणि नवी मुंबई एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 वर गेली आहे.
8मुंबई : राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 38 वर गेली आहे. यवतमाळमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिली आहे. संबंधित कोरोनाग्रस्त रुग्ण दुबईहून परतला होता. याआधी आज मुंबईत 3 आणि नवी मुंबई एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 वर, यवतमाळमध्ये 3 आणि नवी मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. कालही पिंपरी चिंचवडमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला होता.
कोरोना संदर्भात एबीपी माझावर प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे होर्डिंग्स जागोजागी झळकावण्यात येत आहेत. कोपर, दिवा, मुंब्रा या परिसरात हे होर्डिग्स लावण्यात आले आहेत. स्थानिक आणि लोकप्रतिनिधींनी याबाबत हे होर्डिंग्स लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झालीय. या संदर्भात राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलंय. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 38 वर- पुणे - 16
- मुंबई - 8
- ठाणे - 1
- कल्याण- 1
- नवी मुंबई - 2
- पनवेल - 1
- नागपूर - 4
- अहमदनगर - 1
- यवतमाळ - 3
- औरंगाबाद - 1
- Coronavirus | शेतकरी कर्जमाफी योजनेलाही कोरोना व्हायरसचा फटका
- Coronavirus | पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला, राज्यातील आकडा 33 वर
- राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर, मुंबईत आजपासून जमावबंदी लागू, प्रशासनासमोर आव्हान
- इराणमधल्या अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले
- #Coronavirus | मुंबई आयआयटीचे वर्ग, प्रयोगशाळा 29 मार्चपर्यंत बंद
- बेळगावमध्ये दोघांची कोरोना वार्डात तपासणी