बीपीटी रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण; प्रशासन काळजी घेत नसल्याचा कर्मचाऱ्यांचा गंभीर आरोप
बीपीटी रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासन काळजी घेत नसल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय.
मुंबई : वडाळा येथील बीपीटी रुग्णालयातील एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासन योग्य ती खबरदारी घेत नसल्याचा गंभीर आरोप तिथल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. काही रुग्णांना कोरोना कक्षात न ठेवता जनरल वॉर्डमध्येच ठेवण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोना वार्डमध्ये हलवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्माचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. आताच्या घडीला एक नर्स आणि एक कोरोनाबाधित रुग्ण येथे उपचार घेत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. मात्र, काही ठिकाणी रुग्णालय प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. वडाळ्याच्या बीपीटी रुग्णालयातील एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याने कर्मचारी तक्रारी करू लागलेत. रुग्णालय प्रशासन योग्य ती खबरदारी घेत नसल्याचा गंभीर आरोप तिथल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. कोरोना संशयित रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात येत असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, आतापर्यंत 4 रुग्णांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून एकाला कस्तुरबामध्ये हलवण्यात आल्यानंतर त्याचा तिथे मृत्यू झाला आहे. तसेच एक नर्स आणि एक कोरोनाबाधित रुग्ण येथे उपचार घेत आहे.
कोरोनाच्या संकटात एक भाकरी आपण मिळून खाऊ : सिंधुताई सपकाळ
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1761 वर राज्यात आज कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1761 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 17 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 12 जण मुंबईत, 2 पुण्यात तर प्रत्येकी 1 जण सातारा, धुळे, मालेगाव येथील आहे. राज्यात आतापर्यंत 127 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 36 हजार 761 नमुन्यांपैकी 34 हजार 94 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 1761 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38 हजार 800 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 4964 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 208 कोरोना बाधित रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
माझा कट्टा | सिंधुताई म्हणतात...सारे भाऊ, भाकरी मिळून खाऊ! लॉकडाऊनमध्ये सिंधुताईंचे अनुभव | Majha Katta