एक्स्प्लोर
दिलासादायक! ठाणे, मुंब्र्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने घट
ठाण्यात रुग्णांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. दररोज चारशेने वाढणारा कोरोनाचा आकडा आता दोनशेच्या घरात आला आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील मुंब्र्यात देखील रुग्ण संख्येत घट झाली आहे.
ठाणे : कोरानाच्या काळात ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसात ठाण्यातील कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने कमी झालेली दिसून येत आहे. काल ठाण्यात 202 नवीन कोविड रुग्ण सापडले आहेत. दररोज चारशेच्या घरात पोचलेला आकडा आता दोनशेच्या घरात आला आहे. तर दुसरीकडे ठाण्यात कोरोना बधितांची सुरुवात ज्या मुंब्रा परिसरात झाली आता त्याच मुंब्र्यात रुग्ण संख्येत घट झाली आहे. मुंब्रा शहरात शुक्रवारी एकही नवा कोरोना रुग्ण आढळून आला नाही. तर दहा दिवसांत फक्त 53 बाधित सापडले असून पालिकेच्यावतीने साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी उप्याययोजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, त्याचा हा परिमाण असल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने घट
ठाण्यात काल दिवसभरात 202 नवीन कोविड रुग्ण सापडले आहेत. दररोज चारशेच्या घरात पोचलेला आकडा आता दोनशेच्या घरात आला आहे मात्र दुसरीकडे स्वॅब आणि अँटीजन टेस्टचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब म्हणावी लागेल. 202 रुग्णांसह रविवारी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आतपर्यंतचा आकडा 676 वर गेला आहे.
ठाण्यात रुग्णांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. काल ठाण्याच्या नऊ प्रभाग समितीत आढळलेल्या रुग्णांमध्ये माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत रविवारी 30 रुग्ण आढळले तर शनिवारी याच प्रभाग समितीत तब्बल 103 रुग्ण आढळले होते. वर्तकनगर प्रभाग समितीत रविवारी नव्या 18 रुग्णांचा भरणा झालेला आहे. तर शनिवारी 26 रुग्ण आढळलेव होते. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीत रविवारी 31 नवे रुग्ण आढळले तर शनिवारी याच प्रभाग समितीत 20 रुग्ण आढळले होते. शनिवारी नौपाडा कोपरी प्रभाग समितीत 34 रुग्ण आढळले होते. तर रविवारी याच प्रभाग समितीत 30 रुग्ण नवे आढळले आहेत. उथळसर प्रभाग समितीत शनिवारी 18 रुग्ण आढळले होते. तर रविवारी मात्र 25 रुग्ण आढळले आहेत. वागळे प्रभाग समितीत रविवारी नव्या 7 रुग्णांचा भरणा झाला आहे. तर शनिवारी 17 रुग्ण आढळले होते. कळवा प्रभाग समितीत रविवारी 30 नवे रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी मात्र 46 रुग्ण आढळले होते. मुंब्रा प्रभाग समितीत रविवारी नवे 2 रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी याच प्रभाग समितीत 6 रुग्ण आढळले होते. दिवा प्रभाग समितीत रविवारी 16 नवे रुग्ण आढळले आहेत. तर शनिवारी याच प्रभाग समितीत 15 रुग्ण आढळले होते.
ठाण्यात रविवारी 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर आतापर्यंत 676 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत कोरोनावर मात करून घरी गेलेल्या रुग्णांची सांख्य 18181 एवढी आहे. त्यामुळे ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांवर पोचले आहे. ठाण्यात प्रत्यक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 2348 एवढी होती.
गेल्या काही दिवसात रुग्णसंख्य ही दोनशेच्या घरात आल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे रोज जास्तीतजास्त टेस्ट करण्याचे काम देखील सुरू आहे.
मुंब्रा शहरात शुक्रवारी कोरोना रुग्ण आढळून आला नाही
ठाण्यात कोरोना बधितांची सुरुवात ज्या मुंब्रा परिसरात झाली आता त्याच मुंब्र्यात रुग्ण संख्येत घट झाली आहे. झोपडपट्टी तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी रस्त्यावरती मुक्तपणे फिरणार्या नागरिकांमुळे येथील बाधितांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती, मात्र मागील दहा दिवसात येथे फक्त 53 नवे कोरोना बाधित आढळून आले असून शुक्रवारी येथे एकही रुग्ण आढळून आला नाही.
मागील 31 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान मुंब्र्यात आढळलेल्या बधितांची संख्या खालील प्रमाणे
31 जुलै - 06
1 ऑगस्ट- 04
2 ऑगस्ट- 03
3 ऑगस्ट-08
4 ऑगस्ट- 09
5 ऑगस्ट-02
6 ऑगस्ट -06
7 ऑगस्ट - 00
8 ऑगस्ट - 6
मुंब्रा प्रभाग समितीमध्ये सध्या दिवसाला दीडशे ते दोनशे अँटीजन टेस्ट केल्या जात आहेत. जून महिन्याच्या मध्यापासून ते आतापर्यंत अडीच हजार लोकांच्या या टेस्ट करण्यात आले आहेत त्यात केवळ नऊ लोक पॉजिटिव्ह आढळले आहेत. यासोबत आतापर्यंत साडेचार लाख लोकांचा फीवर सर्वे पूर्ण झाला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नाने रुग्ण कमी झाले आहेत असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
सुरुवातीला मुंब्रा या विभागातून केवळ सर्वाधिक रुग्ण आढळून यायचे. या सर्वाधिक रुग्णापासून ते शून्य रुग्णांपर्यंतची वाटचाल सोपी नसली तरी ती अशक्य देखील नाही हे या विभागातील नागरिकांनी दाखवून दिले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement