Coronavirus | विदेशातून परतल्यानंतर 'बाहुबली' अभिनेता प्रभास स्वतःहून आयसोलेट
'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास याने स्वतःला आयसोलेशन केलं आहे. तो नुकताच एका चित्रपटाचे शूटींग पूर्ण करून जॉर्जियाहून परत आला आहे आणि म्हणूनच त्याने स्वत: ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
![Coronavirus | विदेशातून परतल्यानंतर 'बाहुबली' अभिनेता प्रभास स्वतःहून आयसोलेट coronavirus bahubali actor prabhas isolates himself after returning from abroad Coronavirus | विदेशातून परतल्यानंतर 'बाहुबली' अभिनेता प्रभास स्वतःहून आयसोलेट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/22210412/pjimage.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार प्रभासने स्वतःला आयसोलेट केलं आहे. बाहुबली फेम प्रभास नुकताच एका चित्रपटाचे शूटींग पूर्ण करून जॉर्जियाहून परत आला आहे आणि म्हणूनच त्याने स्वत: ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभासने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान अनेक प्रसिद्ध व्यक्ती विदेशातून आल्यावर माहिती लपवून ठेवून लोकांध्ये मिसळताना दिसत आहे. अशा परिस्थिती प्रभासच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
प्रभासने शनिवारी सोशल मीडियावर माहिती दिली की “परदेशात शुटींग करुन सुरक्षित परत आल्यानंतर कोविड -19 चा वाढता धोका पाहात मी स्वत: ला अलग ठेवण्याचे ठरविले आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहात." अनुपम खेर आणि शबाना आझमी यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींनी परदेशातून परत आल्यानंतर स्वत: ला वेगळं केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनीही सोमवारी सांगितले, की कोरोना व्हायरसमुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी स्वत:ला पूर्णपणे अलग केले आहे. 97 वर्षीय अभिनेत्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
CoronaVirus | मुंबई कोरोनाचा दुसरा बळी, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 64 वरुन 74 वर
देशातील मृतांचा आकडा 6 कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे आतापर्यंत देशात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी देशातील 315 लोकांना कोरोनाची लागण झाली. आता ही संख्या वाढून 341 पर्यंत वाढली आहे. आज देशात 26 नवीन कोरोना संसर्गग्रस्त आढळले आहेत. देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. येथे कोरोनामुळे संक्रमित लोकांची संख्या 74 आहे. त्याचबरोबर केरळमध्ये कोरोनाने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या आता 52 झाली आहे. तर, आतापर्यंत राज्यात 2 बळी गेले आहेत.
Coronavirus | आपण सुधारणार कधी?
देशभर आज जनता कर्फ्यू कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी 22 मार्चला देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला देशभर प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.
#JanataCurfew मुख्यमंत्री जनता कर्फ्यू वाढवू शकतात, संजय राऊत यांचे संकेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)