एक्स्प्लोर
CoronaVirus | मुंबई कोरोनाचा दुसरा बळी, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 64 वरुन 74 वर
राज्यात आज 10 रुग्ण आढळले यामध्ये मुंबईतील सहा तर पुण्यात चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. कालपासून कालपासून मुंबईत 12 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात दुसरा बळी गेला आहे. मुबंईत 63 वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. कोरोना बाधित या रुग्णाला 21 मार्चला रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाच्या मृत्यूनंतर देशभरातील मृतांचा आकडा आता 5 वर पोहोचला आहे. याधी 17 मार्चला मुंबईत कस्तुरबा रूग्णालयात 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुबईवरून प्रवास करून ते भारतात आले होते.
महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 10 रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 10 रुग्ण आढळले यामध्ये मुंबईतील सहा तर पुण्यातील चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. कालपासून कालपासून मुंबईत 12 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- पुणे मनपा - 15
- मुंबई - 25
- नागपूर- 4
- यवतमाळ - 4
- नवी मुंबई - 3
- कल्याण - 4
- अहमदनगर - 2
- रायगड - 1
- ठाणे - 1
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी - 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement