एक्स्प्लोर

Coronavirus | आपण सुधारणार कधी?

कोरोना विषाणूचं संकट आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहचलं आहे. हे रोखण्यासाठी सरकार, प्रशासन मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. मात्र, काही लोकांकडून यासाठी सहकार्य होत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. कोरोना व्हायरसचे जे संशयिच रुग्ण आहेत, अशांना होम कॉरंटाईन सांगितलेले असतानाही लोक त्याचे उल्लघन करताना दिसत आहे. त्यामुळे आपण सुधारणार कधी? असा प्रश्न आता जागृत समाजमनातून उपस्थित होत आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसचा विळखा आता वेगाने वाढताना दिसत आहे. हे संकट दूर ठेवण्यासाठी सरकार, प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यासाठी शासनस्तरावरुन मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. मात्र, लोक अजूनही गंभीर नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांवरुन समोर येत आहे. परदेशातून आलेले किंवा त्यांच्या संपर्कातील लोकांना होम कॉरंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सोबतच अशा लोकांनी माहिती लववून न ठेवण्याचंही आवाहन करण्यात आलंय. मात्र, लोक या नियमांचे उल्लघन करत असल्याच्या काही घटना समोर आल्यात. विशेष म्हणजे यात उच्चशिक्षित आणि प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश जास्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. होम कॉरंटाईन असा शिक्का मारलेले लोक खुशाल सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत असल्याचे समोर आल्याने आपण सुधारणार कधी अशा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. पिंपरी चिंचवडमधील आठ डॉक्टरांनी देखील होम कॉरंटाईनचे उल्लंघन केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. रशियामधील कॉन्फरन्स पार पाडून 13 ते 14 मार्च दरम्यान आले. पण या आठ ही डॉक्टरांनी ही बाब दोन दिवस प्रशासनाला सांगितली नव्हती. मात्र, नंतर म्हणजे 16 ते 17 मार्च पासून स्वतःहूनच त्यांनी होम कॉरंटाईन सुरू केलं. ज्यांच्यावर रुग्णाची जबाबदारी असते असे डॉक्टरच याचं उल्लंघन करू लागल्याने, सर्वांनाच धक्का बसला. Coronavirus | मुंबई-पुण्यावरुन गावाकडे येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांची रेल्वे, बस स्थानकावरच तपासणी तरुणाकडून होम कॉरंटाईनचे उल्लंघन; कुटुंबासोबत अनेकांशी संपर्क यापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाकडून होम कॉरंटाईनचा भंग झाल्याचं समोर आलंय. वारंवार घराबाहेर फिरणाऱ्या या तरुणाला शनिवारी पालिका प्रशासन आणि पोलिसांनी थेट रुग्णालयातच दाखल केले. नॉर्वे वरून आलेला या तरुणाला तीन दिवसांपूर्वी 14 दिवस होम कॉरंटाईनच्या सूचना होत्या. मात्र, तो नेहमी घरातून बाहेर पडायचा, पाहुण्यांचीही ये जा सुरू होती, एसीमध्ये न बसण्याचा सल्ला दिला असताना ही त्याने एसी ऑपरेटरला घरात बोलावलं, अशा तक्रारी येत होत्या. म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाने त्याला समज ही दिली होती. मात्र, तरीही नियम न पाळल्याने त्याला रुग्णालयातच दाखल करण्यात आलं. Coronavirus | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार मुंबईत रेल्वे स्थानकावर कॉरंटाईन स्टॅम्प असलेले 16 जणांना थांबवलं ज्यांना घरी कॉरंटाईन राहण्यासाठी सांगितले आहे, अशांच्या हाता कॉरंटाईन स्टॅम्प लावला जात आहे. असे संशयित आता सार्वजनिव वाहतूक व्यवस्था वापरताना दिसत आहेत. नाशिकमध्ये आज एकजण एसटी बसने प्रवास करताना आढळला. तर, रेल्वे मंत्रालयानेही कॉरंटाईन स्टॅम्प असलेल्या आठ जणांनी रेल्वेने प्रवास केल्याची माहिती ट्विट केली आहे. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कॉरंटाईन स्टॅम्प असलेले 16 जण आढळले. रेल्वे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना थांबवण्यात आले. त्यांना वरळीला कॉरंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आलय. Coronavirus | गोव्यात पर्यटकांना बंदी, कोरोनाच्या सावटामुळे 144 कलम लागू, सरकारने घेतले अनेक महत्वाचे निर्णय होम कॉरंटाईनची सूचना असतानाही उद्यान एक्सप्रेसने प्रवास होम कॉरंटाईनची सूचना असतानाही मुंबईवरून गुलबर्गाकडे उद्यान एक्सप्रेसने निघालेल्या एका प्रवाशाला दौंड रेल्वे स्थानकवर उतरविण्यात आले आहे. पूर्वसूचना देऊनही आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने सदर प्रवासी पावणे दोन तास स्ट्रेचरवर होता. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये आणि प्रादुर्भाव वाढू नये याकरीता कतार येथून मुंबई विमानतळावर आलेल्या या प्रवाशाच्या हातावर मुंबई येथे होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. दरम्यान विमानतळावरून आलेला हा 28 वर्षीय तरूण आज (ता. 21) साध्या तिकिटावर मुंबई-बेंगळूरू उद्यान एक्सप्रेसच्या आरक्षित डब्ब्यातून प्रवास करीत होता. हातावर शिक्का असतानाही प्रवास करीत असल्याने उद्यान एक्सप्रेस मधील रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याकडे चौकशी करून नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने त्या प्रवाशाला दौंड येथे उतरविण्याचे आदेश दिले. Coronavirus | कनिका कपूरमुळे कोरोना थेट राष्ट्रपती भवनात? राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणार कोरोना तपासणी गायिका कनिका कपूरकडूनही उल्लघन बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी ती लंडनवरून परतली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरने कोरोनाची लागण झाल्याची गोष्टी लपवून ठेवली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती, एवढचं नाहीतर तिने डिनर पार्टीही ठेवली होती. या अगोदरही असे बऱ्याच घटना उघड झाल्या आहेत. सरकार, प्रशासन इतक्या पोटतिडकीने सांगूनही आपण सुधारणार कधी? आपण आपल्यासोबत कुटुंब आणि समाजाचाही जीव धोक्यात घालतोय हे कधी कळणार? असे प्रश्न आता जागृत समाजमनातून उपस्थित होत आहेत. Janata Curfew | जनता कर्फ्युमुळे पहाटे 4पासून रात्री 10पर्यंत रेल्वे, मोनो, मेट्रो, विमानसेवा बंद

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Goverment Cabinet Decision मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
मोठी बातमी: अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाचा मंत्रिमंडळ बैठकीवर इम्पॅक्ट; शाळा आणि वसतिगृहांबाबत कॅबिनेटचे 7 मोठे निर्णय
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Embed widget