(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccine Dry Run: मुंबई पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज, ड्राय रनचीही गरज नाही!
मुंबई पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. कोरोनावरील लस आल्यानंतर अवघ्या 24 तासांत प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यासाठीचीही तयारी सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी फ्रंट लाईन वर्कर्सचं डेटा अपलोडिंग सुरु असल्याची माहिती आहे.
मुंबई : मुंबई पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. कोरोनावरील लस आल्यानंतर अवघ्या 24 तासांत प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मुंबईत पहिल्या टप्प्यातील 8 केंद्रांचा आणि कोल्ड स्टोरेजचा आज महापालिका अतिरीक्त आयुक्तांकडून आढावा घेतला गेला. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यासाठीचीही तयारी सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी फ्रंट लाईन वर्कर्सचं डेटा अपलोडिंग सुरु असल्याची माहिती आहे.
मुंबईमध्ये लसीकरणासाठी मुंबईत 500 पथकं तयार केली असून 5000 चा स्टाफ तयार ठेवणार आहेत. दोन ते तीन शिफ्टमध्ये लसीकरणासाठीचा हे कर्मचारी काम करणार आहेत. पहिल्या टप्प्यात 8 केंद्र तयार झाली असून आणखी 8 केंद्र राखीव ठेवणार आहेत. ही राखीव केंद्र गरज पडल्यास वापरणार आहेत. सायन, केईएम, कुपर, नायर या मेडिकल कॉलेज मध्ये प्रत्येकी 10 युनिट तयार करणार आहेत. तर राजावाडी, कुर्ला भाभा, बांग्रा भाभा, व्हि.एन. देसाई या हॉस्पिटल्समध्ये 5 युनिट तयार करणार आहेत, अशी माहिती आहे.
Dry Run : कोरोना लसीच्या ड्राय रनला सुरुवात, राज्यात 'या' ठिकाणी सुरुय लसीकरणाची रंगीत तालिम
एका युनिट मार्फत 100 लोकांना लस दिली जाईल. दोन शिफ्टमध्ये काम करुन एका दिवसांत 1000 लोकांना लस दिली जाण्याचं लक्ष्य आहे. मोठे लसीकरण केंद्र असल्यास एका दिवसात 2000 लोकांना लस दिली जाईल. कोल्ड स्टोरेज प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये असेल. तसेच, एफ साऊथ वॉर्ड आणि कांजुरमार्गच्या आरोग्य केंद्रात कोल्ड स्टोरेज असेल. लस साठवण्यासाठी मुंबईत 17 ILR आहेत. प्रत्येक ILR मध्ये 62 हजार लसीचे व्हायल्स साठवले जाऊ शकतात. मुंबईत आज 10 लाख व्हायल्स एका वेळी साठवण्याची क्षमता आहे.
सीरमच्या 'कोविशील्ड' लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी
आज देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु आहे. याआधी देशातील चार राज्यांतील दोन दोन जिल्ह्यात लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्राय रन घेतला होता. राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झालं आहे. या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली गेली आहे.
ड्राय रन महत्वाचा का आहे? लसीकरण कार्यक्रम राबवतांना येणारे अडथळे शोधण्यासाठी आणि त्यावर पुढील उपाययोजना करण्यासाठी हा ड्राय रन घेण्यात येत आहे. तसेच लसीकरण मोहिमेदरम्यान केल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीसाठी फिडबॅक मिळवून त्यात योग्य ते बदल करण्यासाठी हा रन असणार आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येतील प्रत्येक माणसापर्यंत लस पोहोचवायची असेल तर मायक्रो प्लानिंग महत्वाचे आहे, त्यासाठी हा ड्राय रन महत्वाचा आहे.
सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन होणार ड्राय रन सर्व राज्यांतील राजधानीमध्ये तीन सत्रामध्ये घेण्याचा प्रस्ताव आहे. काही राज्यांत अशा जिल्ह्यांचा समावेश आहे जे दुर्गम भागात आहेत. ड्राय रन ही प्रत्यक्षात लसीकरण करताना ज्याप्रमाणे नियोजन असते. तशाच प्रकारे होणार आहे. मात्र, या ड्राय रनमध्ये लस दिली जाणार नाही, फक्त लोकांचा डेटा घेतला जाईल, त्याला Co Win अॅपवर अपलोड केला जाईल. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेन्ट आणि ऑनलाइन डेटा सुरक्षित करणे यासारख्या बर्याच गोष्टींची चाचणी केली जाईल. याव्यतिरिक्त, लसीकरण AEFI म्हणजेच लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांनंतर होणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रतिकूल घटनांच्या व्यवस्थापनावर ड्राय रनचा महत्त्वपूर्ण फोकस असेल.
चार राज्यात ड्राय रन यशस्वी याआधी आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय रन यशस्वीरित्या झाली आहे. 28 आणि 29 डिसेंबरला या चार राज्यात ड्राय रन घेण्यात आला होता. देशात कोरोना विषाणूची दहशत कायम आहे. आता कोरोना विषाणूच्या नव्या विषाणूनेही भारतात शिरकाव केला आहे. आतापर्यंत 25 हून अधिक लोकांना या नवीन विषाणूची लागण झाली आहे. ज्यांचे नमुने नवीन स्ट्रेन साठी पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना राज्य सरकारच्या निर्देशानुसार स्वतंत्र खोल्यांमध्ये वेगळे केले गेले आहेत.
सीरमच्या 'कोविशील्ड' लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वॅक्सिन एक्सपर्ट पॅनेलने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) मान्यता देण्याची शिफारस केली आहे. ब्रिटन आणि अर्जेंटिनानंतर ऑक्सफोर्ड लसीला मान्यता देणारा भारत तिसरा देश आहे. अॅस्ट्रोजेनिकाच्या संयुक्त विद्यमाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 'कोविशिल्ट' लस तयार करत आहे. ऑक्सफोर्डच्या वतीने ही लस तयार केली जात आहे. तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सहकार्याने भारत बायोटेकने 'कोवॅक्सिन' तयार केली आहे, ज्याचे सादरीकरण बुधवारी पॅनेलसमोर करण्यात आले. फाईजरने आपला डेटा सादर करण्यासाठी अधिक वेळ द्यावा अशी मागणी केली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने देखील आतपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आहे. सर्वात आधी 9 डिसेंबर रोजी कोरोना लसीसंदर्भात सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची बैठक झाली होती.