एक्स्प्लोर
Coronavirus | वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी महिनाभर मोफत इंटरनेट
राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. सोबतच खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्याचंही आवाहन त्यांनी केलंय. याच पार्श्वभूमीवर लोकांना घरुन काम करता यावं यासाठी मुंबईत महिनाभर मोफत इंटरनेट देण्याचं आवाहन शिव केबल सेनेने केलं आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (22 मार्च) घोषित केलेला जनता कर्फ्यू आणि कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारनं केलेलं वर्क फ्रॉम होमचं आवाहन. हे आवाहन लक्षात घेता, मुंबईतील केबल चलकांवर आता लोकांना घरी थांबवण्याची जबाबदारी असल्याची भावना समजून घेत, शिव केबल सेनेच्या माध्यमातून या युद्धजन्य परिस्थितीत लोकांना मोफत इंटरनेट सेवा पुरवण्याचं आवाहन सर्व केबल चालकांना करण्यात आलंय. नवं इंटरनेट कनेक्शन घेणाऱ्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं घरी राहू शकतील. याची माहिती शिवकेबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी दिलीय. कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर आणणार आहे. तसेच मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज लाईव्ह प्रसारणात केली. यात जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य औषधी, दुध, इत्यादी दुकाने सुरू राहणार आहेत. यावेळी बऱ्याच खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. Coronavirus | जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयं बंद; रेल्वे, बस सुरु राहणार : उद्धव ठाकरे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी मोफत इंटरनेट कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी आता अनेक व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था समोर येत आहेत. सध्या राज्यात अनेक खासगी कंपन्यांना घरुन काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना परवानगी द्यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलंय. या पार्श्वभूमीवर शिव केबल सेनेच्या माध्यमातून घरुन काम करणाऱ्या लोकांना मोफत इंटरनेट सेवा पुरवण्याचं आवाहन सर्व केबल चालकांना करण्यात आलंय. नवं इंटरनेट कनेक्शन घेणाऱ्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकं घरी राहू शकतील. याची माहिती शिवकेबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी दिलीय. चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला कोरोना विषाणूचा प्रकोप आता जगभर पसरला आहे. जवळपास 160 हून अधिक देशांमध्ये अडीच लाखांच्या आसपास लोकांना याची लागण झाली आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजाराच्या पुढे गेला आहे. भारतातही या व्हायरसने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे आतापर्यंत 206 रुग्ण पॉजिटिव्ह आढळले आहेत. तर, पाच जणांचा यात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 52 कोरोना संक्रमित आहेत. हा विषाणू जास्त पसरू नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. CM Thackeray | महानगरं बंद! महाराष्ट्रातील महानगरं आज रात्रीपासून पूर्णपणे बंद, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आणखी वाचा






















