शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चर्चा, लवकरच माध्यमांशी बोलणार
अजित पवार यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मेलद्वारे पाठविला होता. अजित पवार हे बागडे यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत चर्चा कुणाशीही केली नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
मुंबई : आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर कालपासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन सुरु झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. मात्र पवार काका-पुतण्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही.
अजित पवार कुठे आहेत? अजित पवार यांनी राजीनामा का दिला? पवार कुटुंबात काही वाद आहेत का आणि त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला का? अजित पवार राजकीय संन्यास घेणार का? असे अनेक प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडले आहेत. याबाबत अजित पवार लवकरच माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
अजित पवार मुंबईतच असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण शरद पवार पुण्याहून मुंबईला आल्याने अजित पवारही मुंबईत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मेलद्वारे पाठविला होता. अजित पवार हे बागडे यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. याबाबत बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले आहे. ते माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला. आमच्या नेहमीच्या फाॅरर्मटमध्ये तो आला असल्याने तो स्वीकारला असल्याचे बागडे यांनी सांगितले. या विधानसभेची मुदत संपायला थोडाच अवधी असताना पवार यांच्या राजीनाम्यामुळे खळबळ उडाली आहे.
माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ : शरद पवार
शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार हे अस्वस्थ आहेत. आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत चर्चा कुणाशीही केली नाही. अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी आणि राजीनामा दिल्यानंतर माझ्याशी देखील चर्चा केली नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. मात्र कुटुंबप्रमुख माझी जबाबदारी आहे. त्यामुळे यामागची कारणं जाणून घेतली जातील, असेही पवार म्हणाले.
VIDEO | Ajit Pawar Resignation | अजित पवारांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय?
संबंधित बातम्या
- अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा, राजकीय क्षेत्रात खळबळ
- माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ, राजीनामा देण्याबाबत कल्पना दिली नाही : शरद पवार
- 'माहिती घेऊन सांगतो', पार्थ पवारही अजित पवारांच्या राजीनाम्यापासून अनभिज्ञ
- पवार कुटुंबात यत्किंचीतही वाद नाही, गैरसमज पसरवू नका : शरद पवार
- अजित पवार राजीनामा प्रकरण व शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील १० मुख्य मुद्दे