एक्स्प्लोर
लघुशंकेच्या वादातून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न, दोन गंभीर
त्यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारीला सुरुवात झाली. या चार ते पाच जणांच्या टोळक्याने या युवकांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या हल्लेखोरांनी विनिकेत मोरे याच्या डोक्यासह हातापायावर दगडांनी जोरदार प्रहार केले.
भिवंडी : भिवंडी शहरातील चावींद्रा येथे लघुशंका करण्याच्या वादातून चार ते पाच जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. यावेळी एका युवकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला असून या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विनिकेत मोरे व संकेत वल्लाळ असे गंभीर जखमी युवकांची नावे आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ब्राह्मण आळी येथील संकेत वल्लाळ व विनिकेत मोरे हे दोघे युवक सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास धाब्यावर जेवण करण्यासाठी जात असताना लघुशंकेसाठी अपना वजनकाटा या ठिकाणी थांबले होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्याशी लघुशंका करण्याच्या कारणावरून वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची होऊन हाणामारीला सुरुवात झाली. या चार ते पाच जणांच्या टोळक्याने या युवकांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या हल्लेखोरांनी विनिकेत मोरे याच्या डोक्यासह हातापायावर दगडांनी जोरदार प्रहार केले.
या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर अजून एकही आरोपीला अटक केलेली नाही. या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असून तो सर्वत्र व्हायरल झाला आहे. अज्ञात आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी जखमींच्या कुटुंबीयांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement