एक्स्प्लोर
फेसबुक पोस्टवरुन वाद, मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या
पोलिसांनी आतापर्यंत भाजप युवा मोर्चाचे नेते सुनील दुबे, उमेश सिंह, आकाश शर्मा यांना ताब्यात घेतले असून, साकीनाका पोलिस पुढील तपास सुरु केला आहे.

मुंबई : फेसबुक पोस्टवरुन सुरु झालेला वाद मुंबईत एकाच्या जीवावर बेतला आहे. घाटकोपरमधील काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची हत्या करण्यात आलीय. या हत्येप्रकरणी साकीनाका पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. घाटकोपरमधील असल्फा विभागात काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची हत्या झाली. काल एका युवकाने काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर शेअर केली. या पोस्टवरुन फेसबुकवरच वाद सुरु झाला. त्यावरुन मनोज दुबे आणि त्याच्या ग्रुपमधील काही जणांनी टीका करणाऱ्याला समजावलं. मात्र त्यांच्यातील फेसबुकवरील वाद आणखीच वाढत गेला. त्यानंतर काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मनोज दुबे यांची हत्या झाल्याची समोर आले. हत्येचा ज्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे, ते सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत. मनोज दुबे आणि संशयित आरोपी एकमेकांना ओळखत होते, असेही समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत भाजप युवा मोर्चाचे नेते सुनील दुबे, उमेश सिंह, आकाश शर्मा यांना ताब्यात घेतले असून, साकीनाका पोलिस पुढील तपास सुरु केला आहे.
आणखी वाचा























