एक्स्प्लोर

विरार लोकलमध्ये महिलांची गुंडगिरी, तरुणीला मारहाण

मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. त्यापैकी विरार लोकल या घटनांसाठी कुप्रसिद्धच म्हणावी लागेल. महिलांच्या गुंडगिरीची अशीच घटना मंगळवारी विरार-चर्चगेट लोकलमध्ये पाहायला मिळाली   वसईला उतरण्यासाठी विरार लोकलच का पकडली, असा उर्मट सवाल करत महिलांच्या टोळक्याने एका 20 वर्षीय इंजिनीअरिंगच्या तरुणीला जबर मारहाण केली. ऋतुजा नाईक, असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे.   इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणारी ऋतुजा ही वसईच्या विद्यावर्दनी कॉलेजमध्ये शिकते. महिलांच्या टोळक्याने तिचे केस आणि कपडे धरुन मारहाण केली. इतरंच नाही तर महिलांच्या वादानंतर ऋतुलाजा अस्थमाचा अटॅकही आला.   काय आहे प्रकरण? ऋतुजाने मंगळवारी सकाळी प्लॅटफॉर्म नंबर 2 वरुन 8.40 ची विरार-चर्चगेट ही लोकल पडकली. अतिशय गर्दी असल्याने ती कशीबशी महिलांच्या सेकंड क्लास डब्यास शिरली. मात्र महिलांच्या टोळक्याने तिला टोमणे मारायला सुरुवात केली. वसईला उतरणाऱ्यांनी बोरीवली, अंधेरी आणि वांद्रेपर्यंत असलेल्या लोकलमध्ये चढावं, असं म्हणत वाद घातला. वसईला उतरणारे प्रवासी नालासोपाऱ्याला चढणाऱ्यांचा रस्ता अडवतात. त्यामुळे त्यांना ट्रेनमध्ये चढता येत नाही. नालासोपारा हे विरारनंतरचं स्टेशन आहे.   फाईल फोटो फाईल फोटो वसईला उतरण्यासाठी तयारी करत असताना दोन विशीतल्या आणि दोन पन्नाशीच्या जवळपास असलेल्या चौघींनी  तिला मागे ओढलं. धडा शिकवावा या उद्देशाने तिला वसईला उतरण्यापासून रोखलं. काही महिलांनी तिला मारहाण केली. यामध्ये तिच्या मनगटाला दुखापत झाली. मात्र ती कशीबशी वसई स्टेशनला उतरली.   अज्ञात महिलांविरोधात गुन्हा वसईचे रेल्वे पोलिस निरीक्षक महेश बागवे यांच्या माहितीनुसार अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी महिलांना ओळखू शकेन, असं ऋतुजाचं म्हणलं आहे. आरोपी महिलांच्या ओळखपरेडसाठी ऋतुजा बुधवारी सकाळी 8.10 वाजता विरार स्टेशनवर पोहोचली होती. मात्र सरकारी दिरंगाईमुळे ती ट्रेन चुकली.   मारहाण करणाऱ्या बऱ्याच महिला नालासोपाऱ्याच्या रहिवासी आहेत. त्या नालासोपारा स्टेशनवरुन विरार लोकलमध्ये चढून डाऊन प्रवास करतात, त्यानंतर त्याच लोकलने चर्चगेटच्या दिशेने प्रवास करतात, असं ऋतुजाने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडनं विदेशी गुंतवणूकदार घाबरले, भारतीय शेअर बाजारातून काढता पाय, 6 दिवसात 7342 कोटी काढून घेतले
अमेरिकेच्या टॅरिफ ट्रेडचा धसका, विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय शेअर बाजारातून 7342 कोटी काढून घेतले
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात, कार दोनदा पलटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
कोस्टल रोडवर हाजीअलीच्या वळणावर भीषण अपघात, कार रेलिंगवर आपटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
Ladki Bahin Yojana : दीड लाख लाडक्या बहिणींची योजनेतून स्वत:हून माघार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या घटली
दीड लाख लाडक्या बहिणींकडून योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज, सरकारनं देखील घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant On Rajan Salvi : सामंत बंधूंचा साळवींच्या पक्ष प्रवेशाला विरोध नाही : उदय सामंतABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 10 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report : Raj Thackeray VS Ajit Pawar : राज ठाकरेंचा अटॅक, अजितदादांचा पलटवार; इंजिनाची धडक, घडाळ्याचे ठोकेTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 Feb 2025 : ABP Majha : 11PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडनं विदेशी गुंतवणूकदार घाबरले, भारतीय शेअर बाजारातून काढता पाय, 6 दिवसात 7342 कोटी काढून घेतले
अमेरिकेच्या टॅरिफ ट्रेडचा धसका, विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय शेअर बाजारातून 7342 कोटी काढून घेतले
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात, कार दोनदा पलटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
कोस्टल रोडवर हाजीअलीच्या वळणावर भीषण अपघात, कार रेलिंगवर आपटली, कॉलेजमधील तरुणीचा मृत्यू
Ladki Bahin Yojana : दीड लाख लाडक्या बहिणींची योजनेतून स्वत:हून माघार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या घटली
दीड लाख लाडक्या बहिणींकडून योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज, सरकारनं देखील घेतला मोठा निर्णय
शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!
IPO Update : पैसे तयार ठेवा, आठवड्यात  9 आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 
गुंतवणूकदारांना कमाईची संधी, शेअर बाजारात 9 आयपीओ येणार, जाणून घ्या सविस्तर 
Rohit Sharma : कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
कटकमध्ये रोहित शर्माची कडक बॅटिंग; एका झटक्यात दिग्गजांना मागं टाकलं, अर्धा डझन रेकॉर्डची भर
Rohit Sharma Half Century : लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
लेट पण थेट! हिटमॅन आला अन् सगळ्यांच तोंड केलं बंद, भावानं धावांचा पाडला पाऊस; थेट ख्रिस गेललाही टाकलं मागे
Embed widget