आधी आईस्क्रीममध्ये बोट आता कोल्ड कॉफीमध्ये झुरळ! मालाडमध्ये पुन्हा संतापजनक प्रकार
इनॉर्बिटमधील दुसऱ्या मजल्यावरील लॉन्जमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे. स्ट्रॉने कॉफी पिऊन झाल्यानंतर काचेच्या ग्लासात झुरळाचे अवशेष दिसू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
मुंबई : मालाडमधील आईस्क्रीममध्ये (Malad Ice Cream) मानवी बोट आढळल्याची घटना ताजी असतानाच आता कोल्ड कॉफीमध्ये (Cold Coffee) झुरळ आढळल्याचे तक्रार करण्यात आली आहे. प्रतीक रावत या तरुणानं त्याने ऑर्डर केलेल्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळाचे अवशेष आढळून आल्याची तक्रार केलीय. याप्रकरणी मालाड पोलिसांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय. प्रतीक रावत आणि त्याचा मित्र मालाड इनॉर्बिटमधील दुसऱ्या मजल्यावरील लॉन्जमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे. स्ट्रॉने कॉफी पिऊन झाल्यानंतर काचेच्या ग्लासात झुरळाचे अवशेष दिसू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मालाड पोलिसांनी हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर कलम 125,274,275 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक रावत आणि त्याचा मित्र मालाड इनॉर्बिट मधील दुसऱ्या मजल्यावरील लॉन्च मध्ये कॉफी पिण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे. स्ट्रॉने कॉपी पिऊन झाल्यानंतर काचेच्या ग्लासात झुरळाचे अवशेष दिसू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रतीक रावत याने मालाड पोलिसात तक्रार दिली आहे. आता मालाड पोलीस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहे.
ग्लासमध्ये आढळले झुरळ
कॉफी पिऊन संपत आली असताना थोडी कॉफी ग्लासमध्ये राहिली होती. ग्लासमध्ये पाहिल्यानंतर कॉफीत काहीतरी आढळले. स्पष्ट दिसत नसल्याने त्यांनी बारकाईने त्या ग्लासची पाहणी केली. समोर दिसलेला प्रकार पाहून त्यांना संताप अनावर झाला. कारण आपल्या कोल्ड कॉफीमध्य झुरळ होते, असे ग्राहकाने सांगितले. त्याने लगेचच ही बाब आपल्या मित्राच्याही लक्षात आणून दिली आणि त्याचा फोटो काढले. यानंतर दोघांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले.
हॉटेलमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
त्यांनी घडलेल्या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ काढला होता. तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली. मालाड येथील हॉटेलमध्ये ग्राहकाने मागविलेल्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा हॉटेलमधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा :
Nandurbar News : पोटदुखीमुळं आईनं अल्पवयीन मुलीला हॉस्पिटलला नेलं, डॉक्टरांनी तपासताच नराधम बापाचं 'पाप' समोर, नंदुरबार हादरलं