एक्स्प्लोर
Advertisement
...तर हिंदूत्वाची व्याख्या बदलावी लागेल; संजय राऊत यांचा हिंदू महासभेला टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह उद्या अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर ते पहिल्यांदाचा अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व आलंय. दरम्यान, या दौऱ्याला हिंदू महासभेने विरोध केलाय. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत याविषयी शिवसेनेची भूमिका मांडली.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला हिंदू महासभेने विरोध केलाय. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. कोणी आमच्या अयोध्येत येण्याला विरोध करत असेल तर हिंदूत्वाची व्याख्या बदलावी लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शरयूची आरती करणार नसल्याचं स्वतः खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवाय उत्तर प्रदेश सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली ठरवली असून शरयू किनारी गर्दी होत असल्यानं कार्यक्रम रद्द केल्याचं राऊतांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अयोध्येत जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या दौऱ्याविषयी माहिती दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी साडेपाच वाजता अयोध्येवरून निघतील अशी माहिती, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. तत्पूर्वी ते 2 वाजता पत्रकारांशी संवाद साधतील आणि 4 वाजता रामाचं दर्शन घेतील असं राऊत म्हणालेत. योगी आदित्यनाथ यांच्या विनंतीमुळे दौरा लवकर आटोपणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय.
उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा
अयोध्येतील पहिल्या दौऱ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून अयोध्येत येत आहे. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व असल्याचे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे अगोदर रामलल्लाचे दर्शन घेणार आहे. त्यानंतर ते माध्यमांळी संवाद साधणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
उद्धव ठाकरे शरयूची आरती करणार नाहीत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
शरयू नदीवर आरती करणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्यात शरयू नदीकिनारी मुख्यमंत्री आरती करणार होते. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी माझी चर्चा झाली. सध्या देशात कोरोना व्हायरसमुळे खबरदारीचा उपाय म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शरयू नदीवर यावेळी आरती करणार नसल्याचं राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे आणि काही कॅबिनेट मंत्र्यांसह आणि शिवसेनेचे मंत्री उपस्थित राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. हा संपूर्ण कार्यक्रम शांततेत व्हावा, अशी आमची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.
अयोध्या कुणा एकाची नाही : राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला हिंदू महासभेने विरोध केला आहे. यावर विचारले असता अयोध्या कुणा एकाची नाही. रामलल्ला सर्वांचे आहेत. त्यामुळे इथं कोणीही येऊ शकतो. अयोध्येत येऊन आम्ही कधी राजकारण केलं नाही आणि करणारही नाही. त्यामुळे विरोध झाला तरी आम्ही अयोध्येत येणारच, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. हा राजकीय नाही तर धार्मिक कार्यक्रम आहे. सरकारला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत येणार होते. त्याप्रमाणे ते येत असल्याचे राऊत म्हणाले.
काँग्रेस नेत्यांनीही सहभागी होण्याचे आवाहन
काँग्रेस नेत्यांनीही या कार्यक्रमात सहभागी व्हावी. ज्यांची श्रद्धा रामलल्लावर आहे, त्या सर्वांनी या कार्यक्रमाला यावे, असं आवाहनही राऊत यांनी केलं. मंदिर सर्वांचे आहे, ही कुणा एका पक्षाची किंवा व्यक्तीची जहागिर नाही. रामराज्याची संकल्पना महात्मा गांधी यांनीच आणली होती. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही या कार्यक्रमाला येण्याचं आवाहन राऊत यांनी केलं. दरम्यान, कोणी आमच्या अयोध्येत येण्याला विरोध करत असेल तर हिंदूत्वाची व्याख्या बदलावी लागेल. राम मंदिराच्या निर्माण कार्यक्रमात आमचा सहभाग राहणार आहे. कारण, पहिल्यापासून शिवसेनेची त्यासाठी आग्रही भूमिका राहिली आहे.
CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्या अयोध्या दौरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
हिंगोली
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
Advertisement