एक्स्प्लोर
जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच!: मुख्यमंत्री

मुंबई: शिवसेना-भाजपमधील 25 वर्षांची युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन करु असं ट्वीट केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगाव मधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शिवसेना-भाजपमधील 25 वर्षांची युती तोडल्याचं जाहीर केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही ट्वीट करुन युतीबाबत आपलं मत नोंदवलं.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, ''सत्ता हे साध्य नाही, तर साधन विकासाचे. पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र. जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय परिवर्तन तर होणारच.'' असं म्हणलं आहे.सत्ता हे साध्य नाही तर साधनविकासाचे पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र जे येतील त्यांच्यासोबत जे येणारनाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन तर होणारच
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2017
आणखी वाचा























