एक्स्प्लोर

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालं असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत त्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

मुंबई:  गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालं असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत त्याबाबत स्पष्टीकरण दिलं. “प्रकाश मेहता यांनी शेरा मारलेला प्रकल्प आधीच रद्द झाला आहे, मग घोटाळा कसा?. मेहतांच्या राजीनाम्याची मागणी ही राजकीय हेतूने होत आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले. मात्र तरीही प्रकाश मेहता यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करु. चौकशीत काही आढळलं तर मेहतांवर कारवाई करु, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. राधेश्याम मोपलवार पदच्युत एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठ सनदी अधिकारी आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना चौकशीपर्यंत पदच्युत करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. मात्र मोपलवारांना केवळ पदावरुन दूर करु नका तर त्यांना निलंबित करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. इतकंच नाही तर जो न्याय मोपलवारांना लावला आहे, तोच न्याय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना लावावा, त्यांनाही चौकशी होईपर्यंत मंत्रिपदावरुन हटवावं, अशी मागणी विरोधकांनी केली. मोपलवारांवर सेटलमेंटचे आरोप मुख्यमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्ध महामार्गाचं काम मोपलवारांना देण्यात आलं. मात्र राधेश्याम मोपलवारांवर सेटलमेंटचा आरोप असल्याची बातमी माझानं दाखवल्यानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. प्रकाश मेहतांवर एसआरए घोटाळ्याचा आरोप मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील एफएसआय घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता यांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच विधानसभेतच ही घोषणा केल्याने मेहता यांचा पाय खोलात गेला आहे. एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात झालेल्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी नियम 293 अन्वये विरोधकांनी गेल्या आठवड्यात चर्चा उपस्थित केली होती. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केला होता. 3 केच्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता. मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे या प्रकल्पाला मेहता यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचीही मान्यता होती का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात विचारला. संबंधित बातम्या मोपलवारांना हटवलं, प्रकाश मेहतांनाही हटवा : विखे पाटील  मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश  एबीपी माझाचा गौप्यस्फोट, महामार्गात दलालांची ‘समृद्धी’?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
Ratan Tata:'ती' बातमी कळताच JRD  संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
'ती' बातमी कळताच JRD संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
PETA Letter To Salman Khan : बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Niranjan Hiranandani on Ratan Tata :  रतन टाटांकडून त्यांच्या जगण्यातला साधेपणा शिकण्यासारखा होताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 10 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaSuhas Kande vs Chhagan Bhujbal : छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यास कधीही, कुठेही तयारMukesh Ambani Tribute To Ratan Tata : भारत आणि देशातील उद्योग जगतासाठी दु:खाचा दिवस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
Ratan Tata:'ती' बातमी कळताच JRD  संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
'ती' बातमी कळताच JRD संतापले, रतन टाटांना चांगलंच खडसावलं; स्वत:च्याच कंपनीत काम करण्यासाठी करावा लागला बायोडाटा
PETA Letter To Salman Khan : बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Embed widget