एक्स्प्लोर

उत्तर भारतीयांवर दादागिरी करणाऱ्यांना आम्ही जागा दाखवली : मुख्यमंत्री फडणवीस

उत्तर भारतीयांवरील हल्ले हल्ले थांबले आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मुंबई : ज्यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीय लोकांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही जागा दाखवून दिल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत काल उत्तर प्रदेश दिवस साजरा झाला, त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. जेव्हापासून भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले हल्ले थांबले आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुख्यमंत्र्यानी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. मुंबई फिल्मसिटीचे उपाध्यक्ष इंद्रजित मिश्रा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय हे भाऊ आहेत. जेव्हापासून आमचं सरकार आलं आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले थांबले आहेत. असे हल्ले करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली आहे, असे फडणवीस म्हणाले. उत्तर प्रदेशची भूमी वंदनीय  फडणवीस म्हणाले, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते खूप जुने आहे. उत्तर प्रदेशची भूमी वंदनीय अशीच आहे. ती श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची भूमी आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तिचा विस्तार देशभर झाला. मराठे जसे देशभर विखुरले आहेत. तसेच उत्तर भारतीय देशाच्या काना-कोपऱ्यात पोहचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही उत्तर प्रदेशातून आलेल्या गागा भटांनी मोठी भूमिका बजावली होती. उत्तर प्रदेशचे नागरिकही आता महाराष्ट्राच्या संस्कृतीत दुधात साखर विरघळावी तसेच मिसळून गेले आहेत. त्यांच्या तीन-तीन पिढ्या इथल्याच आहेत. त्यामुळे ते आता मुंबईकर होऊन गेले आहेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्र अग्रेसर  राज्य - योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईच्या वाढीत उत्तर प्रदेशवासियांनीही मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे प्रयत्न आणि पानिपतच्या लढाईतील मराठ्यांचे शौर्य अलौकिकच असे होते. महाराष्ट्राची भूमी संत, थोर राष्ट्रपुरूषांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपला देश सामाजिक समतांचा पुरस्कर्ता आहे. यात महाराष्ट्रातील दूरदृष्टीच्या धुरिणांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपूरमधील दीक्षाभूमीचा विकास आणि मुंबईतील यथोचित स्मारक उभारण्याचे महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न गौरवास्पदच असे आहेत. महाराष्ट्र शासन लोकाभिमुखता आणि विकास पथावरील अग्रेसर असे राज्य म्हणून राहण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे मोठे योगदान असल्याचेही योगी यांनी नमूद केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
IND vs ENG: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, वनडे अन् टी-20 मध्ये आमने सामने येणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारत अन् इंग्लंडमध्ये रणसंग्राम, वनडे अन् टी-20 मालिका रंगणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Raut : काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होतील : नितीन राऊतSharad Pawar NCP : आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देणार : शरद पवारMajha  Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 10 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 Jan 2025 : 6.30 AM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
हात पाय तोडेन, कायमची वाट लावेन; विष्णू चाटेच्या फोनवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडची धमकी
Mahavikas Aghadi : लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या; काँग्रेस नेत्याचा मविआला घरचा आहेर
IND vs ENG: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, वनडे अन् टी-20 मध्ये आमने सामने येणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
भारत अन् इंग्लंडमध्ये रणसंग्राम, वनडे अन् टी-20 मालिका रंगणार, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Mumbai Crime: मुंबईत धक्कादायक घटना, आईने  10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
मुंबईत स्क्रिझोफेनियाग्रस्त आईने 10 वर्षांच्या मुलाला वायरने गळा आवळून संपवलं; बाप कोलमडून पडला
Santosh Deshmukh Case : आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
आरोपींना फाशी द्या! संतोष देशमुख प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा; जरांगे, धस यांची तोफ धडाडणार
Gotya Gitte: सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
सदैव सोबत, वाल्मिक अण्णा माझा विठ्ठल! गोट्या गित्ते सोशल मीडियावर चर्चेत, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
PM Kisan : मोठी बातमी, पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?
पीएम किसान सन्मान योजनेच्या नव्या नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक, 19 वा हप्ता कधी मिळणार?
Embed widget