वसईत आईच्या दागिन्यासाठी अकरा वर्षाचा चिमुरडा चोराशी भिडला, स्थानिकांच्या मदतीने चोराला अटक
पोलिसांच्या ताब्यात असलेला चोर सराईत असून, त्याने आतापर्यंत 7 ते 8 घरफोड्या केल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
वसई-विरार : विरारमध्ये एक अकरा वर्षीय मुलगा आईचे दागिने वाचवण्यासाठी चोरांना भिडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारील विरारच्या पश्चिमेकडील ए बी इस्टेट परिसरात घडली. मुलाच्या साहसामुळे चोराला पकडण्यात यश आलं आहे.
मंगळवारी दुपारी दिव्या महाडिय या आपल्या मुलीला शाळेत सोडवायला गेल्या होत्या. या दरम्यान दिव्या यांचा मुलगा तनिष महाडिक घरी एकटाच होता. एकटा मुलगा असल्याचं पाहून एक सराईत चोरटा घरात घुसला. चिमुरडयाला धमकावून तो घरातील सोन्याचे दागिने घेऊन जात होता.
मात्र चोरट्याच्या हातात आईचा सोन्याचा हार पाहून तनिषने धाडस करून चोरट्याला अडवण्याचा प्रयत्न सुरु केला. आपल्या पेक्षा मोठा आणि अंगाने जाडजूड असलेल्या चोरट्याच्या हातातील हार हिसकावून तनिषने आरडाओरडा सुरु केला. तेवढ्यात दिव्या महाडिक या देखील घरी पोहोचल्या.
त्यानंतर त्यांनीही चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याने तेथून पळ काढला. त्यावेळी सोसायटीमधील नागरिकांनी मायलेकांचा आरडाओरडा एकूण चोराचा पाठलाग केला आणि पकडलं. नागरिकांनी चोरट्याला चांगलाच चोप दिला. त्याचे हात बांधून ठेवले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं.
ताब्यात असलेला चोर सराईत असून, त्याने आतापर्यंत 7 ते 8 घरफोड्या केल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. 11 वर्षाच्या या मुलाच्या धाडसामुळे एक सराईत चोरटा पोलिसांना सापडल्याने त्याच्यावर कौतुकचा वर्षाव होत आहे.
VIDEO | सकाळच्या घडामोडींचा वेगवान आढावा | माझा 20-20