एक्स्प्लोर
छगन भुजबळांची पुन्हा आर्थर रोड कारागृहात रवानगी
मुंबई: जेजे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या छगन भुजबळांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.. काल रात्री 9 वाजताच्या सुमारास भुजबळांना ऑर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आलं. ईडीच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर भुजबळ आता ऑर्थर रोड जेलमध्ये राहणार आहेत.
प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे भुजबळांवर जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, यापुढे गरज असेल तरच भुजबळांना रुग्णालयात न्या. असे आदेश कोर्टानं दिले आहेत.
त्यासोबतच, भुजबळांनी हायकोर्टाकडे केलेला शेवटचा जामिन अर्ज देखिल हायकोर्टानं फेटाळलाय.. त्यामुळे त्यांना जामीन हवा असेल तर थेट हायकोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे.
हायकोर्टाने जामीन फेटाळला!
त्याआधी मुंबई हायकोर्टाने छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे भुजबळांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. तसंच भुजबळांचा हायकोर्टातील हा शेवटचा जामीन अर्ज होता. आता जामीनासाठी त्यांना थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे.
भुजबळांचा लेटेस्ट फोटो ‘माझा’च्या हाती
दरम्यान भुजबळांचा लेटेस्ट फोटो माझाच्या हाती लागला आहे. दाढी पांढरी झालेले भुजबळ या फोटोमध्ये चालताना दिसताहेत.. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे भुजबळ सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. भुजबळ हॉस्पिटलच्या लॉबीत फिरताना दिसत आहेत. त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला होता. त्यानंतर हा फोटो समोर आला आहे.
भुजबळांना अटक
पैशांची अफरातफर आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणात ईडीने छगन भुजबळांना 14 मार्च रोजी रात्री अटक केली होती. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 11 तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती.
संबंधित बातम्या
भुजबळांची शेवटची संधी हुकली, हायकोर्टाने जामीन नाकारला
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
भुजबळांच्या ‘या’ व्हॉट्सअॅप डीपीवरुन चर्चांना उधाण!
पांढरीशुभ्र दाढी, पांढरे केस, भुजबळांचा नवा फोटो ‘माझा’कडे
जे.जे. हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी नको!: छगन भुजबळ
छगन भुजबळ हे विराट कोहली इतकेच फिट : दमानिया
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ 26 जणांना भेटले : ईडी
अटकेविरोधात छगन भुजबळांची हायकोर्टात याचिका दाखल
भुजबळांना जामीन मंजूर, मात्र जेलमधून सुटका नाही
भुजबळांच्या व्हायरल फोटोमागील सत्य उघड !
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
भुजबळांची अटक राजकीय हेतूनं प्रेरित: शरद पवार
छगन भुजबळ यांना दोन दिवसांची ईडीची कोठडी
पुढील दोन-चार वर्ष भुजबळ जेलबाहेर येणार नाही: किरीट सोमय्या
भुजबळांना अटक हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस: अंजली दमानिया
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
राजकारण
विश्व
Advertisement