एक्स्प्लोर
या चार अटींवर छगन भुजबळांना जामीन मिळाला
मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वाढतं वय आणि ढासळती प्रकृती लक्षात घेत पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वाढतं वय आणि ढासळती प्रकृती लक्षात घेत पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. अखेर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर!
- तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं,
- खटला सुरु असताना साक्षीदारांना प्रभावित न करणं,
- पासपोर्ट जमा करणे,
- तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाऊ नये
आणखी वाचा























