एक्स्प्लोर
इंडिकेटरवर दिसणारी लोकल कुठे पोहचली? पाहा गुगल मॅपवर

मुंबई : इंडिकेटरवर 1.40 ची चर्चगेट फास्ट लागली आहे, पण वेळ उलटून गेली तरी तुमच्या लोकलचा पत्ता नाही. प्लॅटफॉर्मवरुन वाकून पाहूनही तुमची ट्रेन दिसत नसेल, तर ती गुगल मॅपवर शोधा. लवकरच मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांना त्यांची ट्रेन गुगल मॅपवर लोकेट करणं शक्य होणार आहे. प्रवासी संघटनांकडून सातत्याने होणाऱ्या मागणीनंतर आता तुम्हाला तुमच्या लोकलचं लाईव्ह स्टेटस पाहता येणार आहे. पश्चिम रेल्वेचे अधिकारी गुगलशी संपर्क साधून ट्रेन्स गुगल मॅपशी लिंक करण्याचा प्रस्ताव मांडणार आहेत. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर उपनगरी रेल्वेंमध्ये मोटरमनच्या केबिनमध्ये जीपीएस सिस्टम बसवण्यात येणार आहे. यापूर्वी पश्चिम रेल्वेने दिशा हे मोबाईल अॅप लाँच केलं आहे. यावर ट्रेन्स, स्टेशन, प्लॅटफॉर्म याविषयी माहिती उपलब्ध होते. मात्र हे अॅप ऑफलाईन तंतोतंत माहिती मिळत नव्हती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण























