एक्स्प्लोर

राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही, चंद्रकांत पाटलांचा दावा

विधानसभा निवडणुकात सर्वाधिक मतं भाजपला मिळाली आहेत. नंबर दोनची मतं शिवसेनेला आणि त्यानंतर राष्ट्रवादीला मतं मिळाली आहेत, असेही पाटील म्हणाले. राज्यात सर्वात जास्त महिला आमदार, SC -ST आमदार भाजपचे आहेत. कुठल्याही पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा मिळवता आलेल्या नाहीत, असेही पाटील यांनी सांगितले.

मुंबई : भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपकडे असलेल्या आमदारांची संख्या 119 आहे. यामुळे राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही असे सांगत भाजपचेच सरकार पुन्हा येईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला असल्याचे चंद्रकात पाटील यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तीन पक्षांचे सरकार येणार आणि पाच वर्षे टिकणार, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे, याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता राज्यात भाजपकडे 119 आमदारांची संख्या आहे. आमच्याशिवाय राज्यात स्थिर सरकार येऊ शकत नाही असा आम्हाला विश्वास आहे, असं पाटील म्हणाले. आमची कोणाशीही चर्चा सुरू नाही, पण राज्यात आमच्याशिवाय स्थिर सरकार कोणी देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. भाजपच्या कालपासून तीन बैठका झाल्या आहेत. विधानसभेत निवडून आलेले आमदार आणि अपक्ष आमदारांसोबत या बैठकांमध्ये चर्चा झाली. बूथ ते राष्ट्रीय अध्यक्षांची रचना यावर यात चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकात सर्वाधिक मतं भाजपला मिळाली आहेत. नंबर दोनची मतं शिवसेनेला आणि त्यानंतर राष्ट्रवादीला मतं मिळाली आहेत, असेही पाटील म्हणाले. राज्यात सर्वात जास्त महिला आमदार, SC -ST आमदार भाजपचे आहेत. कुठल्याही पक्षाला 100 पेक्षा जास्त जागा मिळवता आलेल्या नाहीत, असेही पाटील यांनी सांगितले. 1990 पासून कुठल्याही पक्षाला शंभरपेक्षा जास्त जागा मिळवता आलेल्या नाहीत, असेही पाटील यांनी सांगितले.
एकतर भाजपसोबत किंवा भाजपचंच सरकार येणार, फडणवीस यांचा बैठकीत निर्धार : सूत्र
परतीचा पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाली. सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेऊन अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना देण्यात आल्या. सरकारकडून मदत दिली जाणार आहेच. मात्र 23 हजार कोटींचे इन्श्युरन्स कव्हर राज्यात आहे. त्या माध्यमातून मदतीसाठी प्रयत्न केले जावेत, अशा सूचना दिल्या गेल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले. कालच राफेल संबंधी सुप्रीम कोर्टाने दिला. राहुल गांधींनी देशाची दिशाभूल केली. यासाठी राहुल गांधींनी देशाची माफी मागायला हवी, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत, असे पाटील म्हणाले. पाटील म्हणाले की, बूथ, मंडल ते जिल्हा स्तरावर संघटना मजबूत करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमून निवडणुकीचे विश्लेषण करणार आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Embed widget