एक्स्प्लोर

एकतर भाजपसोबत किंवा भाजपचंच सरकार येणार, फडणवीस यांचा बैठकीत निर्धार : सूत्र

फडणवीस यांनी आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर आणि लोकांमध्ये जाऊन हे ठासून सांगण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देखील आहे. सत्ता स्थापनेच्या वेळेस मुंबईत बोलवू, तोपर्यंत जनतेत जाऊन भाजप सरकार येणार हा विश्वास द्या, असेही फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : राज्यात भाजपशिवाय सत्ता येऊच शकत नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व आमदारांना दिला असून एकतर भाजपसोबत किंवा भाजपचंच सरकार येणार असल्याचा निर्धार फडणवीस यांनी या बैठकीत केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी आमदारांना शेतकऱ्यांच्या बांधावर आणि लोकांमध्ये जाऊन हे ठासून सांगण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती देखील आहे. सत्ता स्थापनेच्या वेळेस मुंबईत बोलवू, तोपर्यंत जनतेत जाऊन भाजप सरकार येणार हा विश्वास द्या, असेही फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. दरम्यान, भाजप सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष ठेवून असल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी बैठकीनंतर सांगितले होते. आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच आहेत. सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे ते म्हणाले होते. राज्यातील राजकीय परिस्थितीवर आणि इतर पक्षातील सुरू असलेल्या चर्चेवर आमचं लक्ष आहे, असेही शेलार म्हणाले होते. राज्यभरात 90 हजार बुथवर संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच उद्यापासून ग्रामीण भागातील आमदार आणि परवापासून शहरी भागातील आमदार तसेच विधानपरिषदेच्या आमदारांसह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात दोन ते तीन दिवसांचा मदत पाहणी दौरा करणार आहेत, असे शेलार यांनी सांगितले. आज प्रथमच भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीला नितेश राणे, शिवेंद्र राजे भोसले, गणेश नाईक, कालिदास कोळंबकर प्रथमच भाजपच्या कमळावर निवडून आलेल्या आमदारांसह भाजपचे सर्व आमदार आणि पाठिंबा दिलेले तसेच मित्रपक्षांचे आमदार देखील उपस्थित होते. आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, व्ही सतीश, विजय पुराणिक यांच्या नेतृत्वात भाजप आमदारांची बैठक ही बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच 'देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है' अशी घोषणाबाजी करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Radheshyam Mopalwar Government Project: माजी आयएएस अधिकाऱ्याच्या कंपनीला राज्य सरकारकडून 200 कोटींचं कंत्राट, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील
माजी आयएएस अधिकाऱ्याच्या कंपनीला राज्य सरकारकडून 200 कोटींचं कंत्राट, गेटवे ऑफ इंडिया परिसरातील रेडिओ क्लब प्रवासी जेट्टी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Embed widget