एक्स्प्लोर
अटकेविरोधात छगन भुजबळांची हायकोर्टात याचिका दाखल
मुंबई: मनी लॉड्रिंगप्रकरणी अनेक महिन्यापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आता आपल्या अटकेविरोधात एक नवी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
आपल्याला चुकीच्या पद्धतीनं अटक करुन हा खटला चालवला जात आहे. असं भुजबळांनकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं आहे. तसेच प्रकृती अस्वास्थामुळे लवकरात लवकर जामीन मिळावा अशी मागणीही भुजबळांकडून करण्यात आली आहे. लवकरच त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
कायद्यानुसार कोणालाही चुकीच्या पद्धतीनं अटक करता येत नाही. त्यामुळे त्याविरोधात दाद मागण्यासाठी कोर्टात याचिकाही दाखल करता येते. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या भुजबळांकाडून आता ही याचिक दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच छातीत दुखत असल्यानं छगन भुजबळांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यानंतर भुजबळांनी ईडीवर गंभीर आरोपही केले होते. ईडीद्वारे सादर केलेला मेडिकल रिपोर्ट माझा नसून इतरांचा, मेडिकल रिपोर्ट सादर करुन मला फीट घोषित करण्यात येत आहे. असा आरोप भुजबळ यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement