एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja 2025 : लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन सोहळा उत्साहात संपन्न; पाहा PHOTOS
Lalbaugcha Raja 2025 : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 92 वं वर्ष आहे. नुकताच लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन सोहळा पार पाडला.
Lalbaugcha Raja 2025
1/6

'नवसाला पावणारा बाप्पा' अशी ख्याती असलेल्या मुंबईतील 'लालबागचा राजा' च्या दर्शनाला देशभरातून भक्तांची रांग लागते.
2/6

गणेशोत्सवाची चाहूल लागली की लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये गणेश मुहूर्ताचे, पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात.
3/6

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 92 वं वर्ष आहे.
4/6

यावर्षी लालबागच्या राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी, बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते अनंत चतुर्दशी,शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे.
5/6

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक 6 वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत संपन्न झाला.
6/6

सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.
Published at : 14 Jun 2025 09:32 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















